रोहिताश्व गौड २० वर्षांनंतर त्यांच्या अॅक्टिंग स्कूलला भेट दिल्यानंतर झाले भावूक!
शाळा ही फक्त शिक्षणाचे माध्यम नसून आपल्या जीवनाला आकार देणारे ज्ञान, अनुभव व आठवणींचा संग्रह असलेले खास स्थान आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर जीवनात पुढे गेल्यानंतर देखील या महत्त्वपूर्ण काळादरम्यान मिळालेल्या शिकवणी व गोड आठवणी आपल्या कायमस्वरूपी स्मरणात राहतात. पुन्हा शाळेला भेट देणे, ओळखीच्या सभागृहांमधून चालत जाणे आणि गतकाळाला उजाळा देणे हृदयस्पर्शी अनुभव असू शकतो. नुकतेच, एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये मनमोहन तिवारीची भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय असलेले अभिनेता रोहिताश्व गौड यांना हृदयस्पर्शी प्रवासाचा पुन्हा एकदा अनुभव घेण्याची संधी मिळाली. दोन दशकांनंतर त्यांनी दिल्लीमधील त्यांच्या अॅक्टिंग स्कूलला भेट दिली आणि त्यांच्या मूळ संस्कृतीशी जुडलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
याबाबत सांगताना मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील रोहिताश्व गौड ऊर्फ मनमोहन तिवारी म्हणाले, ”हिमाचलमध्ये माझे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी अभिनयामध्ये करिअर घडवण्यासाठी दिल्लीला आलो. मी एनएसडीमध्ये (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) प्रवेश मिळवला. मी पहिल्यांदा कुटुंबापासून दूर राहत होतो आणि मला सांगावेसे वाटते की, तो काळ अत्यंत आव्हानात्मक होता. नवीन शहराशी जुळवून घेत माझी अभिनय कौशल्ये निपुण करण्यासाठी बरीच वर्षे लागली. आता मागे वळून पाहताना माझे मन कृतज्ञतेने भरलेले वाटते. अॅक्टिंग स्कूलमधील माझा काळ आणि सोबत केलेल्या परफॉर्मन्सनी माझ्या करिअरला आकार दिला. विशेषत: मुंबईला आल्यानंतर माझी पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याची इच्छा होती, पण दिल्लीला भेट दिल्यानंतर देखील तसे करता आले नाही. अखेर नुकतेच मला ती संधी मिळाली. मनमोहन तिवारी म्हणून लव कुश रामलीलाला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला आलो होतो. दुसऱ्या दिवशी प्रतिष्ठित संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याने मी दोन दशकांनंतर माझ्या शाळेला भेट दिली. मी गेटमधून प्रवेश करताच माझ्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळले. जुन्या आठवणी डोळ्यांसमोर दिसू लागल्या. मी माझे शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांसोबत वेळ व्यतित केला. त्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद आणि त्यांनी माझी मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील माझ्या कामाचे केलेले कौतुक हृदयस्पर्शी होते. मी कॅन्टीनमध्ये चहाचा आस्वाद घेण्यापासून स्वत:ला रोखू शकलो नाही. आम्हाला आर्थिकदृष्ट्या संघर्ष करावा लागला होता तेव्हा कॅन्टीनमधील चहा आमच्या जीवनातील महत्त्वपूर्ण भाग बनली होती. मी त्याच मंचावर श्री. राम गोपाळ बजाज यांनी दिग्दर्शन केलेले नाटक ‘लैला मजनू’ पाहण्याचा आनंद देखील घेतला. मी यापूर्वी या नाटकात काम केले होते, ज्यामुळे माझ्यासाठी तो भावूक क्षण होता आणि जुन्या आठवणी समोर आल्या. पायाभूत सुविधांमध्ये बदल झाला असला तरी महत्त्वाकांक्षी कलाकारांसाठी आपुलकी व उत्साह तोच आहे. जुन्या मित्रांना भेट देण्याचा क्षण आनंददायी सरप्राइज होते, जेथे मला जाणीव झाली की क्षेत्रात यशस्वी करिअर घडवलेल्या अनेकांचे या स्थानाशी दृढ नाते आहे. या जाणीवेमुळे माझे मन आनंदाने भरून गेले आणि मी पुन्हा एकदा या ठिकाणी भेट देण्यास उत्सुक आहे.”
पहा तुमच्या लाडक्या मनमोहन तिवारीला ‘भाबीजी घर पर है’मध्ये दर सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता फक्त एण्ड टीव्हीवर!
