शाहरुखच्या वाढदिवासा दिवशी प्रेक्षकांना मोठी भेट
आज ‘किंग खान’ शाहरुख खान याचा 58 वा वाढदिवस आहे. या विशेष दिवशी त्याच्या आगामी ‘डंकी’ या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यामध्ये पुन्हा एकदा शाहरुख खान रोमॅंटिंक अंदाजात दिसणार आहे.

तब्बल चार वर्षे सिनेसृष्टीपासून दूर राहिलेल्या शाहरुख खानने ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाच्या माध्यमातून त्याने जोरदार कमबॅक केल. त्यानंतर त्याचा ‘जवान’ (Jawan) चित्रपट तर प्रेक्षकांनी डोक्यावरच घेतला. पठाण चित्रपटाने जगभरात तब्बल एक हजार कोटींपेक्षा अधिक कमाई केली. तर ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत ‘पठाण’चाही रेकॉर्ड मोडला. आता शाहरुख चा ‘डंकी’ (Dunki) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. येत्या 21 डिसेंबरला हा चित्रपट नाताळाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. यावर्षात प्रदर्शित होणारा शाहरुख खानचा हा तिसरा चित्रपट आहे. त्यामुळे यंदाच वर्ष शाहरुखने गाजवलं असे म्हणायला हरकत नाही.
