Saturday, June 20, 2026
BusinessLatest News

नेक्सस वेस्टएंड आणि पॅव्हिलियन मॉलतर्फे पर्यावरणपूरक उत्सव मोहीम

 

पुणे  : संपूर्ण जग वाढत्या कार्बन उत्सर्जनामुळे निर्माण झालेल्या वाढत्या आव्हानांना तोंड देत आहे. यावर उपाय म्हणून पर्यावरणपूरक वस्तूंच्या निर्मितीला आणि वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. नेक्सस वेस्टएंड आणि पॅव्हिलियन मॉल यांनीही या मोहिमेला हातभार लावण्याच्या उद्देशाने शाश्वत उत्सव मोहिमेची घोषणा केली आहे. दिवाळीनिमित्त त्यांच्या मॉलमधील सजावटीसाठी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्यात आला आहे.या मोहिमेअंतर्गत नेक्सस वेस्टएंड मॉलमध्ये शनिवारवाडा साकारण्यात आला आहे, तर नेक्सस पॅव्हिलियन मॉलमध्ये भव्य हवा महल साकारण्यात आला आहे. यातून भारतीय संस्कृतीचे, समृद्ध स्थापत्यकलेच्या वारशाचेही दर्शन घडते. हा अनोखा उपक्रम केवळ पर्यावरणपूरक वातावरणाला चालना देण्यापुरता मर्यादित नाही, तर यातून भारतीय वारसा आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचे मूर्त रुपात दर्शन घडविले जात आहे.

प्रत्येक मॉलमध्ये इंडिया गेट, हवा महल, कमळ मंदिर यांसारख्या प्रतिष्ठित स्मारकांपैकी एक स्मारक कलात्मकदृष्ट्या साकारण्यात आले असून, ते पुनर्वापर करता येण्याजोग्या पुठ्ठ्यापासून तयार केले आहे. यातून सामूहिक पर्यावरणीय जबाबदारीद्वारे साध्य होणाऱ्या सकारात्मक परिणामाची प्रचिती येते. पर्यावरणपूरक मोहिमेला प्रोत्साहन देण्यासह नेक्ससने या सणाच्या हंगामात ग्राहकांचा खरेदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. १५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेत पाच हजार रुपयांच्या वर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी निश्चित बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading