रावण दहन कार्यक्रम थांबवण्यासाठी संघानं पुढाकार घ्यावा. धर्म सकारात्मक बाबींवर चालावा, नकारात्मक बाबींवर नव्हे – प्रकाश आंबेडकर
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोहन भागवतांचं भाषण म्हणजे चोराच्या मनातलं चांदणं आहे, असं म्हटलं आहे. आपल्या हातात सत्ता आल्यास आपण नरेंद्र मोदी आणि मोहन भागवतांना आर्म अॅक्ट मध्ये जेलमध्ये टाकू असे मत प्रकाश आंबेडकर यांनी केलं, तसेच रावण दहन कार्यक्रम थांबवण्यासाठी संघानं पुढाकार घ्यावा. धर्म सकारात्मक बाबींवर चालावा, नकारात्मक बाबींवर नव्हे, असे आंबेडकर म्हणाले, ते आकोला येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी उत्सवात आज मुख्य भाषण केलंय. ते अकोला येथे बोलत होते. या भाषणात भागवत म्हणाले की 2024 च्या निवडणुकीसाठी लोकांना भडकावून मत घेतले जाण्याची शक्यता वर्तवली आहे. भागवतांच्या याच भाषणावर आंबेडकरांनी जोरदार टीका केली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्हाला सत्ता मिळाली तर आपण मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवू. तसंच, रावण दहनाची प्रथा थांबवली जावी, असंही ते म्हणाले. यासाठी संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. नागपुरातील संघाचा दसरा मेळावा शस्त्रांची पूजा करणारा मेळावा आहे. कारखानदार यंत्रांची अन लष्कर शस्त्रांची पूजा करतं. परंतू संघ शस्त्रपूजा का करतं? हे स्पष्ट व्हावं आमचा अकोल्यातील दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी घेत असलेला मेळावा हा लोकांचा कार्यक्रम. यात लोकांचे कार्यक्रम अन् लोक कल्याणाची दिशा ठरवण्यात येते असेही आंबेडकर यांनी सांगितले.
देशात रावण दहनाला आदिवासींचा विरोध आहे. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाकडे पाहावं. पूर्वी दक्षिणेत राम दहनाचे कार्यक्रम व्हायचे. नेहरुंनी मध्यस्थी केल्यानं ही प्रथा थांबली. आदिवासींची ही मागणी हिंदुत्ववादी संघटनांना आवाहन आहे की त्यांनी ही प्रथा थांबवावी. रावण दहन कार्यक्रम थांबवण्यासाठी संघानं पुढाकार घ्यावा. धर्म सकारात्मक बाबींवर चालावा, नकारात्मक बाबींवर नव्हे, असंही यावेळी आंबेडकर म्हणाले.
