जिंकून येण्याासठी तुम्ही निष्ठा गहाण टाकू शकत नाही – पंकजा मुंडे
बीड : चारित्र्यहीन आणि पैशांच्या जोरावर निवडून येणा-यांना आता पाडणार असा एल्गार भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी केलेआहे. पंकजा मुंडे यांचा रोख नेमका कोणाकडे होता असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. जिंकून येण्याासठी तुम्ही निष्ठा गहाण टाकू शकत नाही असा घरचा आहेर त्यांनी नाव न घेता पक्षाला दिलाय. २०२४ पर्यंत तुम्हाला न्याय देण्यासाठी मी मैदनात उतरणार असे म्हणत पंकजा मुंडेंनी निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहे.
राज्यात सध्या फोडाफाडीचे राजकारण आणि अनपेक्षित घडामोडीमुळे वातावरण ढवळून निघाले आहेत.पाच वर्षे मी पक्षासाठी मरमर निष्ठेने काम केले. मध्यप्रदेश, परळीत काम केले. भगवान बाबांना सुद्धा दुसरा गड बनवावा लागला, भगवान श्री कृष्णाला मथुरा सोडावी लागली, असे म्हणत पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, निवडणुकीत माझा पराभव झाला. माझा पाय मोडला तर मला कुबड्या घेऊ चालावे लागेल. माझ्यामुळे या स्टेजवर बसलेल्यांना त्रास कमी होतो पण माझ्या जनतेल जास्त त्रास होतो. दर वेळी तुमचा नेहमी अपेक्षा भंग होतो. त्यासाठी मी तुमची माफी मागते. कुणी म्हणते ताई या पक्षात चालल्या आहेत. दुस-या पक्षात जाण्या इतकी पंकजा मुंडेची निष्ठा लेचीपेची नाही.
आता आपल्याला त्रास देणा-यांचे घर आपण उन्हात बांधू. आता माझ्या माणसांना मी त्रास होणार नाही. पंकजा मुंडेच्या भाषणादरम्यान कोणतरी वायर कापल्याचा आरोप पंकजा मुंडेंनी केला आहे. वायर कापल्यानंतर माझा आवाज कुणी दाबू शकणार नाही, असे म्हणत पंकजा मुंडेंनी नाव न घेता भाजपवर टीका केली. माझा आवाज संपूर्ण देशात पोहचला पाहिजे. मी लोकांना फक्त स्वाभिमान देऊ शकते असे पंकजा मुंडे म्हणाल्या
