भाजप पासून सावध रहा उद्धव ठाकरेंचा जरांगे पाटलांना सल्ला
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा आज मुंबईमध्ये पार पडला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. तसेच मनोज जरांगे पाटील यांना भाजप पासून सावध रहाण्याचा सल्ला दिला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘तमाम हिंदू माता आणि भगिनींनी, 57 वर्ष झाली आपण परंपरा थांबू दिली नाही. मोडता घालण्याचा प्रयत्न अनेकांनी केला पण ही परंपरा कायम सुरू आहे. मेळावा संपल्यावर आपण खोकासुराचा वध करणार आहोत. रावण हा शिवभक्त होता, एवढा शिवभक्त असून सुद्धा रामाला त्याला मारावं लागलं होतं. रावणाने सिताला पळवलं होतं. त्यामुळे त्याला मारावं लागलं. आज आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी शिवसेना पक्षाची चिन्ह चोरलं. ज्या प्रकारे हनुमानाने रावणांची लंका दहन केली होती, तशी मशाल धारी शिवसैनिक माझ्यासोबत आहे’, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
मी मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो. पोलिसांनी त्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज केला. मी तिथे गेलो आणि हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. मी त्यावेळी गावात गेलो होतो, त्यावेळी तिन्ही सांजेची वेळ होती, एका घरातून एक माऊली औषण करण्यासाठी आली होती. मी त्यांना सांगितलं, मला ओवाळू नका, तर त्यांनी मला राखी बांधली आणि रडू फुटलं. त्यांनी सांगितलं, मला ढोरा सारखं मारलं, मी सुटली तिथून पण माझा मुलगा आणि सुनेला मारलं ते हॉस्पिटलमध्ये आहे. मी त्यांना जाऊन पाहिलं. मी सुद्धा गृहमंत्री होती, त्यावेळीही आंदोलनं झाली, हीच मराठा बांधव होती. पण कुणावर गोळीबार आणि लाठीचार्ज झाला नाही. मनोज जरांगे यांना भेटलो आणि त्यांनी गोळी दाखवली. पण, जरांगे पाटील यांना सांगतो पहिले यांच्यापासून सावध राहा. हा भगवा इकडे डोलाने फडकतोय, अब्दाली आला होता, त्याने सुद्धा दोहीची बिज लावायची आणि भांडणं लावून द्यायची. तुमच्या पेटत्या घरावर आग लावली जाते त्यावर पोळी शेकली जाते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.
पंतप्रधान मोदींनी घराणेशाहीचा आरोप केला होता. हो, मी माझ्या घराण्यातून आलो आहे. पण जो कुटुंब व्यवस्था मानत नाही, त्यांनी घराणेशाहीवर बोलू नये. कुटुंब पद्धत ही आपली संस्कृती आहे. त्यावर बोलणारे मग तुम्ही कोण आहात. घराणेशाहीचा आरोप आमच्यावर करत आहात, पण तुमच्या पक्षात बाप मुख्यमंत्री, मुलगा खासदार आहे, त्यांना थांबवून दाखवा. सरन्यायाधीश चंद्रचुड यांचा मुलगा आज सरन्यायधीश झाला आहे. घराणेशाहीवर आरोप करावे पण ज्याच्या मागेपुढे कुणीच नाही, त्याच्या हाती सत्ता दिली नाही पाहिजे. हिटलरसोबत असंच झालं आहे. हिटलरने जर्मनी पार उद्धवस्त करून दाखवली. ज्याच्या घरापुढे कुणीच नाही, अशा माणसाच्या हाती सत्ता कशी द्यायची.
एकदा भरल्या कोर्टामध्ये कुणाला तारीख देण्याचे काम सुरू होते. त्यावेळी सोबत आलेल्या विचारतात, पुढची केस काय आहे, एका मुलीला छेड काढण्याची केस आहे. न्यायाधीशांनी आरोपीला बोलावलं तर आजोबा होते. त्यांना विचारलं तर मी वीस वर्षांपूर्वी छेड काढली होती, ती केस अजूनही सुरूच आहे. सांगायचं असं की, तुम्हाला अपात्रेचा निर्णय काय घ्यायचा तो घ्या, पण हे सगळं देश पाहत आहे. केसचा निकाल लागण्याआधी निवडणुका घेऊन दाखवा. होऊन जाऊ द्या खुल्या मैदानात काय व्हायचं ते होऊ द्या.
‘सध्या विश्वचषक सुरू आहे, त्यात एक सारखी जाहिरात सुरू आहे. अक्षय कुमार, शाहरुख आणि अजय देवगण हे तिघे येतात आणि दोन दोन बोट दाखवतात. आमच्याकडे सुद्धा तिनं माणसं आहे, ते सुद्धा दोन बोट दाखवत आहे, आमच्याकडे हाफ आहे. ते कमला पसंद आहे, हे कमळा पसंदवाले आहे. पसंद आपली आपली, त्यांना कमला पसंद आहे, यांना कमळ पसंद आहे. तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या’, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
