Sunday, August 30, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

धनगर समाजाला आरक्षणासाठी पेठून उठण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन

अहमदनगर : चौंडी येथे धनगरांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे उपस्थित होते. मनोज जरांगे यांनी मेळाव्यात संबोधित केले. तसेच धनगर समाजाला आरक्षणासाठी पेठून उठण्याचे आव्हान केले. उठाव केल्याशिवाय पर्याय नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले, मनावर घ्या म्हणजे आरक्षण मिळेल. आपल्या दोघांचे दुखणे एकच आहे. राज्यातील शेवटच्या टोकावरील धनगराला तुम्हाला आरक्षण सांगावे लागेल. धनगराची लाट उसळली तर या देशात कोणतीही शक्ती थांबवू शकणार नाही. पण ती कसरत तुम्हाला करावी लागणार त्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही.

तुमचा व्यवसाय शेती आमचा व्यवसाय शेती आहे. मी विचारले विदर्भातील मराठ्यांना आरक्षण का दिले तर ते म्हणाले त्यांचा व्यवसाय शेती आहे मग आमचा व्यवसाय काय आहे?, असा प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केला.
धनगर समाज घटनेत असून यांना आरक्षण का नाही, असा प्रश्न मला देखील पडला आहे. सामान्य धनगर बांधवांना आता काहीतरी डोके लावावा लागणार. नाहीतर काही खरे नाही. तुम्हाला तुमच्या लेकरा-बाळांचे भले करायचे असेल तर पेटून उठावे लागेल. तुम्ही घर अन् घर जाग करा मी ताकदीने तुमच्या पाठीशी आहे. नेते म्हणाले तसे करु नका?, असे मनोज जरांगे म्हणाले.

आमच्यात देखील काही नेते उठवले होते. मात्र सामान्य मराठ्यांनी दांडके हाती घेतले म्हटल्यावर ते काही बोलत नाहीत. राजकारण डोक्यात ठेऊन काही केले तर आरक्षण मिळणार नाही. १७ दिवस अख्ख मंत्रिमंडळ माझ्याजवळ बसून होते. मी काहीही करु शकलो असतो पण मी माझ्या जातीशी प्रमाणिक आहे. जातिशी गद्दारी करणारी औलाद माझी नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

५० दिवसात आरक्षण मिळेल, याचा पाठलाग करा. निवडणुकीची वाट बघू नका. फक्त जात म्हणून लढा राजकारण मधे आणू नका, सर्व धनगरांनी महाराष्ट्रात जावे. घरोघरी जावे हे केले तर आरक्षण मिळायला वेळ लागणार नाही. पण सामान्य लोकांना उठाव करावा लागले, असे आव्हान मनोज जरांगे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading