Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

श्री सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज युवक संघटना पुणे आयोजित नवरात्रोत्सव निमित्त ५१ कन्यांचे कन्यापुजन

पुणे :  श्री सोमवशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज युवक संघटना आयोजित नवरात्रोत्सव निमित्त ५१ कुमारींचे कन्यापुजन आनंदमय उत्साहात साजरा करण्यात आला. नवरात्रीमध्ये कन्या म्हणजेच कुमारींच्या पुजेला विशेष महत्व आहे. तीन ते दहा वर्षे वयोगटातील कुमारी हे देवीचे ५१ पीठ आहेत त्याचप्रमाणे या वर्षी ५१ कन्याचे कन्या पूजन ठेवले गेले तसेच युवक संघटना व उत्कर्ष महिला मंडळा तर्फे या कन्या पुजनाचे महत्व व अर्थ उपस्थित सर्व समाज बांधवांसमोर सांगण्यात आले. सर्व कन्यांचे पुजन झाल्यानंतर उपस्थित समाज बांधवांनी कन्यांना भेटवस्तु दिली.

सदर कार्यक्रमामध्ये उत्कर्ष महिला मंडळाकडून  सविता दिलीप काळोखे यांचा सत्कार महिला मंडळाचे कार्यकारणी अर्चना कोल्हापुरे यांच्या हस्ते करण्यात आला, तसेच अनिल काळोखे यांचा सत्कार ट्रस्टचे हिशोब तपासनीस संजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला तसेच  प्रीतम दामजी यांनीही कार्यक्रमाला बहुमूल्य योगदान दिले व ट्रस्ट कडून  गोपाळ चव्हाण,  राजेश कुक्कर,. उमेश आरसिध्द,  संदीप वडनेरे,  प्रशांत पवार,  संतोष पवार, आशा चव्हाण, ऋचा आरसिध्द, मीना धोंगडी व प्रमिला पवार तसेच युवक संघटने कडून  संदीप रंगापुरे,  विशाल पवार,  रोहन दामजी,  मयूर पवार,  महेश दामजी, बिपीन पवार, निखिल आरसिध्द,   संजय वडनेरे,  तेजस आरसिध्द,   गणेश चव्हाण यांनी दरवर्षी नवरात्रोत्सवात समाजामध्ये कन्यापुजन साजरा करणार असे अवाहन केले.
श्री. सो. स. क्षत्रिय समाज युवक संघटना पुणे यांनी सर्व श्री. सो. स. क्षत्रिय समाज ट्रस्ट, महिला मंडळ, वधुवर सूचक मंडळ, आणि सर्व समाज बांधवांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading