Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

दात हे शरीर आरोग्याचे प्रवेशद्वार असुन, मानवी आरोग्यात दातांचे स्थान महत्वाचे – गोपाळदादा तिवारी

पुणे :  मुले डॅाक्टर, इंजीनिअर व्हावीत हे बहुतांश पालकांचे स्वप्न असते. त्या अनुषंगाने, कु राजस्वीनी राजेंद्र थोरवे हीने डेंटीस्ट होऊन पालकांचे स्वप्न खरे केल्याचे समाधान थोरवे कुचुंबियांना लाभले. मुलांनी निवडलेल्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी क्षितिजावर पोहोचणे, हा पालकांसाठी आनंद व अभिमानाचा क्षण असतो असे उदगार आमदार रविंद्र धंगेकर यांनी थोरवे डेंटल क्लीनिक ऊदधाटन प्रसंगी काढले. अध्यक्षस्थानी काँग्रेस नेते व सामाजिक कार्यकर्ते गोपाळदादा तिवारी होते.

‘शरीराच्या आरोग्यात दातांचे आरोग्य महत्वाचे’ असुन. दात हे शरीर आरोग्याचे प्रवेशद्वार असल्याचे गोपाळदादा तिवारी यांनी आपल्या भाषणात सांगितले. ते पुढे म्हणाले की, घकाघकीच्या जीवनात डेंटीस्ट कडुन किमान ठरावीक वेळेनी दांत क्लीनिंग करणे ही ‘एकंदर आरोग्य जपणारी चांगली सवय’ असल्याचे ही सांगितले.

या प्रसंगी स्थानिक नगरसेवीका सौ आरती ताई कोंढरे, विजय ढेरे यांची शुभेच्छापर भाषणे झाली.आश्विनी थोरवे यांनी आभार मानले. या प्रसंगी निवृत्त पोलीस अघिकारी राजेंद्र थोरवे, सुभाषशेठ थोरवे, सुनिल खाटपे, राजेंद्र अण्णा देशमुख, बाळासाहेब जगताप, महादेव थोरवे, नंदुशेठ पापळ, गणेश धुले, बापू भेगडे इ उपस्थित होते. आमदार मोहनदादा जोशी, मा नगरसेवीका रुपालीताई पाटील, अजय खेडेकर, सम्राट थोरात, गायत्री खडके संतोष नांगरे, पुरषोत्तम नांगरे, धनंजय भिलारे इ नी सदीच्छा भेट दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading