Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ‘या’ 4 दिवशी ग्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक

पुणे  : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असून १७ ते १९ आणि २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत द्रुतगतीमार्गाच्या मुंबई आणि पुणे वाहिनीवर वाहतूक पूर्णत: बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

१७ ऑक्टोबर रोजी पुणे वाहिनीवरील खंडाळा बोगदा कि.मी ४७/९०० व लोणावळा कि.मी. ५०/१०० येथे, १८ ऑक्टोबर रोजी मुंबई वाहिनीवरील दस्तुरी पोलीस चौकी कि.मी. ४४/८०० व खालापूर कि.मी. ३३/८००, १९ ऑक्टोबर रोजी ढेकू गाव कि.मी. ३७/८०० व कि.मी. ३७, २६ ऑक्टोबर रोजी खंडाळा बोगदा कि.मी. ४७/१२० तर खोपोली एक्झीट कि.मी. ३९/९०० वर गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू राहणार आहे.

काम पुर्ण झाल्यावर दुपारी १ वाजता सदर वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading