समाज कल्याण स्थापना दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन
पुणे : समाज कल्याण स्थापना दिनाचे औचित्य साधून समाज कल्याण विभाग व मॉर्डन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मॉर्डन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिवाजीनगर येथे विविध योजनांची माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंझारराव, राज्यशास्त्र विभागप्रमुख दादाराम खोकले, बार्टीच्या प्रकल्प अधिकारी शीतल बंडगर, समतादूत उषा कांबळे, तेजस्वीनी कांबळे, किर्ती आखाडे, मॉडर्न महाविद्यालयाचे समन्वयक सुल्तान इनामदार, आदिनाथ जावीर आदी उपस्थित होते.
यावेळी लोंढे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, महा-डीबीटी शिष्यवृत्ती, शासकीय वसतीगृह, परदेशी शिष्यवृत्ती आदी समाज कल्याण विभागाच्या विद्यार्थ्याभिमुख योजनांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, व्यायाम, बदलती जीवनशैली व युवकांसमोरील आव्हाने यावर मार्गदर्शन करून विद्यार्थांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांचे व शंकाचे निराकरण केले.
