Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्याचे ग्रामदैवत श्री. तांबडी जोगेश्वरी मातेचा मंदिरात घेतले दर्शन

पुणे:आजपासून नवरात्री सणाची सुरवात झाली आज पहिला दिवशी प्रामुख्याने महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॅा.नीलम गोऱ्हे यांनी पुण्याचे ग्रामदैवत श्री. तांबडी जोगेश्वरी मातेचा मंदिरात दर्शन घेतले . त्यांच्यासोबत पुणे पोलीस शहर परिक्षेत्र-१ चे उपायुक्त श्री. संदीप सिंह गिल सह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील शिवसेना महिला सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यांच्या उपस्थिती मातेच पूजन करून सह दर्शन घेतले.

डॅा. नीलम गोऱ्हे यांनी मंदिरात मातेचे अगदी थोड्या वेळेत दर्शन घेतले , जेणेकरून भाविकांना गर्दीचा त्रास होऊ नये सुरक्षतेची खबरदारी घेतली. डॅा. गोऱ्हे म्हणाल्या , खास करून महाराष्ट्रातील महिला आणि मुली सुरक्षित राहो.कुटुंबात असो या शैक्षणिक क्षेत्रात असो किंवा कामाच्या ठिकाणी असो या दृष्टिकोनातून पुरुष आणि स्त्रिया एकत्र मिळून महाराष्ट्राच्या विकासासाठी काम व्हावे मी देवीचरणी प्रार्थना केली .
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस,  अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालू आहे त्यातुंन शेतकऱ्यांना शेतीमालाला रास्त भाव , विद्यार्थ्यांना ऊत्तम शिक्षण , सगळ्या समाजांना न्याय मिळेल यासाठी मी प्रार्थना केलेली आहे .पंतप्रधान  नरेंद्र मोदी नमो स्त्री शक्ती विधेयक आणलेले आहे. त्यांच्याबद्दल त्यांचे आज आभार मानलेले आहे व आदिशक्तीने महिलांची प्रगती करण्यासाठी अशाच प्रकारने काम करावे यासाठी नारीचेतना
ही मोहीम आजपासून मी हाती घेतलेली आहे. नारीचेतना मोहमेबाबत डॅा.नीलम गोऱ्हे ऊद्या सोमवारी दुपारी ३ वा विधानभवन, पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत असे त्या म्हणाल्या.
यावेळी शिवसेना शहर संघटिका सौ.पूजा रावेतकर, उपशहर संघटिका सौ. श्रृती नाझिरकर, अनिता परदेशी, शबाना देशपांडे, सुदर्शना त्रिगुणाईत, आदी महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading