Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

ऑनलाइन जुगारी PSI सोमनाथ झेंडेची होणार चौकशी; लाच प्रकरणी झाले होते निलंबन

पिंपरी : पिंपरी – चिंचवड पोलिस मुख्यालयात ऑन ड्यूटी पीएसआय सोमनाथ झेंडे यांनी ऑनलाइन जुगरात दीड कोटी रुपये जिंकले आहेत, बांगलादेश विरुद्ध इंग्लंड  या क्रिकेट सामन्यावर त्यांनी हा जुगार जिंकला आहे.  या प्रकानंत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून आता  पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडेंची पोलीस उपायुक्तांकडून चौकशी होणार आहे. प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं पिंपरी चिंचवड पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाइन जुगार`खेळून करोडपती झालेला,  पिंपरी-चिंचवडच्या दंगलविरोधी पथकात शिक्षा म्हणून सध्या काम करीत असलेल्या या सोमनाथ झेंडे यांना दोन वर्षांपूर्वी लाचखोरीत अटक झाली होती.

सध्या सुरु असलेला विश्वचषक आपण नियमितपणे पाहत असून क्रिकेटची आवड असल्याचे सोमनाथ झेंडे यांनी सांगितले.   गेल्या तीन चार महिन्यांपासून ड्रीम 11 या ऑनलाइन जुगार अॅपवर  क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार बांगलादेश विरुद्ध इंग्लंड सामन्यावर टीम लावली होती. त्यात दीड कोटींचे बक्षीस मिळाले आहे,

विविध प्रकारच्या ऑनलाईन जुगारांमुळे तरुणाई भरकटत चालली आहे, अशात अनेकदा फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आलेत. असं असताना पिंपरी चिंचवडमध्ये  पोलीस उपनिरीक्षक असलेले सोमनाथ झेंडे  ऑनलाइन जुगार खेळत असल्याने राज्यातील पोलिस दलात चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरुद्ध थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच तक्रार करण्यात आल्याने झेंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, सोमनाथ झेंडे चाकण पोलिस ठाण्यात कार्यरत असताना आलेल्या एका तक्रारीतील संशयिताविरुद्ध कारवाई न करण्यासाठी त्यांनी ८५ हजार रुपयांची लाच मागून ती आपल्या पंटरमार्फत (दलाल) घेतली होती. त्यात अटक होऊन त्यांचे निलंबन झाले होते. सहा महिन्यांच्या निलंबनानंतर ते पुन्हा पोलिस सेवेत आले; पण त्यांना साइड ब्रॅंच देण्यात आली. तेथे राहून  त्यांनी हा ऑनलाइन जुगार खेळण्याचा पराक्रम केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading