Monday, August 31, 2026
BusinessLatest News

1H 2023 SPIVA® इंडिया स्कोअरकार्ड भारतीय इक्विटी आणि बाँड म्युच्युअल फंडांसाठी कमी कामगिरी दर दर्शवते

तीन आणि पाच वर्षांच्या कालावधीत ते वाढलेले आहेत

मुंबई : S&P Dow Jones Indices (S&P DJI) या जगातील आघाडीच्या इंडेक्स प्रदाता कंपनीने 2023 च्या पहिल्या सहामाहीसाठी त्यांच्या S&P निर्देशांक विरुद्ध सक्रिय निधी (SPIVA®) इंडिया स्कोअरकार्डचे निकाल प्रकाशित केले.

या SPIVA स्कोअरकार्डमध्ये 2023 च्या पहिल्या सहा महिन्यांत विविध फंड – श्रेणींमध्ये भारतातील सक्रिय व्यवस्थापकांची भिन्न कामगिरी दिसते. बहुतेक भारतीय इक्विटी लार्ज-कॅप फंड त्यांच्या मानकाला मागे टाकण्यात अयशस्वी ठरले. यासोबतच सक्रियपणे व्यवस्थापित फंडांपैकी 58% फंड्स हे S&P BSE 100 पेक्षा कमी कामगिरी करत आहेत.

2023 च्या पहिल्या सहामाहीत फिक्स्ड इन्कम फंड श्रेणीमध्ये S&P BSE इंडिया गव्हर्नमेंट बाँड इंडेक्स 4.7% ने वाढला. तर या काळात बेंचमार्कला मागे टाकणे केवळ एक षष्ठ्यांशापेक्षा कमी सक्रिय बॉण्डना शक्य झाले. ते देखील 85.2% या कमी कामगिरी दरासह. तथापि, 3- आणि 5-वर्षांच्या कालावधीत कमी कामगिरी दर 75.0% आणि 66.7% पर्यंत घसरला. तर कालावधी वाढल्याने काही फंड्सची कामगिरी खराब झाली.

S&P डाऊ जोन्स इंडेक्सेसच्या निर्देशांक गुंतवणूक धोरणाचे संचालक बेनेडेक व्होरोस म्हणाले की, “२०२३ च्या सुरुवातीच्या महिन्यांतभारतीय शेअर बाजाराने स्थानिक चलनात विविध बाजार भांडवल विभागांमध्ये काही लक्षणीय वाढ पाहिली. उदाहरणार्थ, S&P BSE 400 MidSmallCap निर्देशांक हा भारतीय इक्विटी मिड-/स्मॉल-कॅप फंडांसाठी बेंचमार्क आहेत्याने केवळ S&P BSE 200 च्या एकूण परताव्यांना मागे टाकले नाहीतर S&P BSE 100 मध्ये 5% पेक्षा जास्त परतावाही दिला आहे.”

  • याव्यतिरिक्त, 2023 च्या पहिल्या सहामाहीत S&P BSE 400 MidSmallCap निर्देशांक 12.4% ने वाढला असताना, 45.3% सक्रिय व्यवस्थापकांनी त्या कालावधीत निर्देशांकापेक्षा कमी कामगिरी केली. दरम्यान, SPIVA इंडिया स्कोअरकार्डमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व फंड श्रेणींमध्ये, भारतीय इक्विटी मिड-/स्मॉल-कॅप फंडांनी 5 वर्षांच्या काळातील सर्वोत्तम कामगिरी केली, ही बाब उल्लेखनीय आहे. मिडस्मॉलकॅप इंडेक्समधील फक्त 38.1% फंडांनी S&P BSE 400 पेक्षा कमी कामगिरी केली.

इतर श्रेणींमध्ये वेगळेपणे, S&P BSE इंडिया बाँड इंडेक्स 2023 च्या पहिल्या सहामाहीत 4.6% वाढला परंतु SPIVA इंडिया स्कोअरकार्डमधील सर्व श्रेणींमध्ये भारतीय कंपोझिट बाँड फंड व्यवस्थापकांचे कमी कामगिरीचे दर सर्वाधिक म्हणजे 95.7% एवढे होते.

इंडियन कंपोझिट बॉण्ड फंडांचे 1-, 3- आणि 5-वर्षांच्या काळात सर्व श्रेणींमध्ये टिकण्याची शक्यता सर्वात कमी होती. यातही श्रेणीतील निधीचा पाचवा हिस्सा गेल्या 5 वर्षांत बंद किंवा विलीन झाला होता. SPIVA स्कोअरकार्ड्सवर भौगोलिक आणि श्रेणींमध्ये वारंवार पाहिल्याप्रमाणे, कमी कामगिरीचे दर सामान्यतः ज्या कालावधीत मोजले गेले त्या कालावधीसह वाढले.

Report 1a: निर्देशांकानुसार कामगिरी केलेल्या निधीची टक्केवारी (संपूर्ण परताव्यावर आधारित)

निधी श्रेणी तुलना निर्देशांक YTD (%) 1-Year (%) 3-Year (%) 5-Year (%) 10-Year (%)
Indian Equity Large-Cap S&P BSE 100 58.06 83.33 86.21 92.86 61.24
Indian ELSS S&P BSE 200 17.50 34.21 56.10 70.73 66.67
Indian Equity Mid-/Small-Cap S&P BSE 400 MidSmallCap Index 45.28 78.00 53.06 38.10
Indian Composite Bond S&P BSE India Bond Index 95.65 94.24 65.00 99.30
Indian Government Bond S&P BSE India Government Bond Index 85.19 88.00 75.00 66.67

Source: S&P Dow Jones Indices LLC, Morningstar and Association of Mutual Funds in India.  Data as of June 30, 2023.  Returns are shown in INR.  Past performance is no guarantee of future results.  Table is provided for illustrative purposes.  Underperformance rates for the Indian Equity Mid-/Small-Cap, Indian Composite Bond and Indian Government Bond categories are reported for time horizons over which the respective benchmark indices were live.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading