मधुमेहामुळे अंधत्व येऊ शकणाऱ्या रुग्णांना आयुर्वेदाने नवी दृष्टी
पुणे : पुण्यातील डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक रिसर्च (डीएसआयआर) मान्यताप्राप्त संशोधन संस्थेने ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’ हा आजार असलेल्या रुग्णांसाठी जगातील पहिली, मुखावाटे घेता येणारी आणि वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित केलेले आयुर्वेदिक औषध विकसित केले आहे. हे औषध रुग्णांच्या उपचारासाठी बाजारात उपलब्ध झाले आहे. या संशोधनाचा मुख्य उद्देश हा परिणामकारक व सुरक्षित अशी चिकित्सा शोधणे हा होता. आयुर्वेदिक तत्त्वाने या औषधाचे संशोधन झाले असल्यामुळे दृष्टीतील सुधारणे बरोबरच रुग्णात सार्वदेहिक सुधारणा दिसून आली. मधुमेहामुळे येणाऱ्या अंधत्वासाठी मुखावाटे घेता येणारी जगातील पहिली चिकित्सा ठरली आहे. तिमिरेक्स आर (TIMIREX-R) असे या औषधाचे नाव आहे.
‘आयुर्वेद रसायनी’चे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश बेंडाळे म्हणाले, “आधुनिक वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी विशेषतः भारतीय रुग्णांसाठी ही प्रगती वरदान ठरेल. ‘Timirex R’ हे भारतीय वैद्यक प्रणाली मध्ये अत्यंत उपुयक्त असणारे असे द्रव्ये वापरून, रिव्हर्स फार्माकॉलॉजि तत्त्वांवर आधारित संशोधन आहे. या औषधामध्ये डायबेटिक रेटिनोपॅथीच्या उपचार पद्धतीत क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे.”
क्लिनिकल रिसर्चचे प्रमुख संशोधक व अन्वेषक डॉ. अश्विनी एम.जे. म्हणाले की,” क्लिनिकल अभ्यासातील रुग्णांमध्ये या औषधाचा अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. ज्या रुग्णांना नियमित अंतराने लेसर किंवा इंट्राव्हिट्रिअल इंजेक्शन्स अशा उपचारांची आवश्यकता होती त्यांना Timirex R’ हे औषध दिल्यानंतर इतर उपचारांची गरज भासली नाही.
गोव्याचे मुख्यमंत्री, डॉ. प्रमोद सावंत यांनी “सिनर्जी 2023, असोसिएशन ऑफ सर्जन, प्रॅक्टिशनर्स, ऍकॅडेमिशियन ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी आणि ईएनटी ऑफ इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन्स (आय एस एम)” च्या 6 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘ ला अधिकृतपणे लाँच केले आहे. असोसिएशन ऑफ शलाकी यांनी आयुष मंत्रालय (भारत सरकार) व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या सहकार्याने ६ ते ८ ऑक्टोबर या दरम्यान गोव्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद भरवली होती. या परिषदेत ६०० हुन अधिक इंडियन सिस्टिम ऑफ मेडिसिन मधील नेत्ररोग व कान, नाक, घास तज्ज्ञ उपस्थित होते. या परिषदेत भारतासह अमेरिकेतील तज्ञांचा देखील सहभाग होता.
मधुमेहाची जागतिक राजधानी असणाऱ्या भारतामध्ये मधुमेहाबरोबरच त्याच्या दुष्परिणामांची झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या दुष्परिणामापैकी सर्वात जास्त मानसिक खच्चीकरण करणारा दुष्परिणाम म्हणजे मधुमेहामुळे होणारा परिणाम. यालाच वैद्यकीय भाषेत ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’ असे म्हणतात. डोळ्यावरील मधुमेहाचे उशिरा होणारे निदान अथवा दीर्घकालीन मधुमेह अथवा रक्तातील साखर नियंत्रित करणाऱ्या औषधाचा अपेक्षित परिणाम न होणे इत्यादी घटकामुळे मधुमेहाचा दृष्टीपटलावर (रेटिना) दुष्परिणाम होऊन अंधत्व येऊ शकते.
सध्या या आजारासाठी ज्या सध्या ज्या आधुनिक चिकित्सा पद्धती उपलब्ध आहेत त्यामध्ये डोळ्यात दिले जाणारे इंजेक्शन अथवा लेझर चिकित्सा यांचा समावेश होतो. परंतु या चिकित्सानाही अनेक मर्यादा आहेत. ज्यात अश्या स्वरूपाच्या इंजेक्शनची गरज वारंवार पडणे, मधुमेही रुग्णाची व्याधिप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे या स्वरूपाच्या इंजेक्शनमुळे जंतू संसगाचा धोकाही वाढतो. तर काही इंजेक्शननंतर फायदा न होणे, दृष्टीपटल (रेटिना) खराब होणे इत्यादी दुष्परिणाम होतात. तसेच अश्या चिकित्सा प्रायः मोठ्या शहरामध्ये उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील रुग्ण या चिकित्सेपासून वंचित राहतो. म्हणून आयुर्वेदाच्या माध्यमातून अश्या स्वरूपाच्या जागतिक आव्हानाकरिता आयुर्वेद प्रणित काही संशोधन पर रुग्णकेंद्रीत चिकित्सा उपलब्ध करता येऊ शकते का हया दृष्टीने पुण्यातील रसायनी बायोलॉजिक्स या संस्थेने हे संशोधन केले. रसायनी बायोलॉजिक्स ही भारत सरकारच्या वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान विभाग संस्थेकडून मान्यताप्राप्त आहे.
—–
कोठे झाले संशोधन?
भारतातील विविध संस्थांमध्ये केलेल्या संशोधनात (मल्टीसेण्ट्रिक क्लिनिकल ट्रायल) मधुमेहाने अंधत्व येण्याचा धोका असणाऱ्या तसेच ज्या रुग्णांना लेझर थेरपी अथवा डोळ्यांमध्ये इंजेक्शन देऊनही अपेक्षित फायदा झाला नाही अशा रुग्णांचा समावेश होता. एस डी एम कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड हॉस्पिटल, हासन, के एल इ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर, बेळगावी व पुण्यातील निमी आयकेयर यांचा सहभाग होता. या संशोधनामध्ये आधुनिक चिकित्सेतील नेत्रतज्ज्ञ व आयुर्वेदिक तज्ञांचाही सहभाग होता.
—–
कसे झाले संशोधन?
रुग्णांच्या नियमित केल्या जाणाऱ्या रक्त तपासण्या बरोबर अत्यंत प्रगत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा यात वापर केला गेला. चिकित्सा सुरू करण्यापूर्वी डोळ्याचा सिटीस्कॅन (ओ सी टी) तसेच डोळ्याची अँजिओग्राफी (एफ एफ ए) तसेच नियमित कालावधीने तसेच चिकित्सेच्या शेवटी पुन्हा या तपासण्या करून चिकित्सेचा परिणाम कसा होत आहे याचा अभ्यास केला गेला. संशोधन पथकातील इतर सदस्यांमध्ये डॉ. अविनाश कदम, डॉ. राजेश पवार, डॉ. अरुण बिरादर, कु. तन्मयी भालेराव, कु. शरयु तुपकर, डॉ. आरती नारखेडे आणि डॉ. धनश्री इंगळे यांचा समावेश होता
—–
चिकित्सेचा परिणाम काय दिसून आला?
रुग्णाच्या दृष्टीमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली. दृष्टीपटल रेटिना तसेच डोळ्याच्या पुढील भागात (व्हीट्रीअस) रक्तस्त्राव होणे कमी झाले. अनावश्यक तयार होणाऱ्या रक्तवाहिन्यांना प्रतिबंध करण्यात आला. बहुतांशी रुग्णास या अभ्यासांती किमान सहा महिन्यापर्यंत इतर कोणतेही चिकित्सा घेण्याची गरज भासली नाही. मधुमेहामुळे अंधत्व येणान्या रुग्णांकरिता घरच्या घरी घेता येण्याजोगी तरीदेखील
—-
औषधाची वैशिष्ट्ये काय आहेत
-आयुर्वेदिय नैदानिक मूलतत्त्वे तसेच औषध शास्त्रातील प्राविण्य आणि अत्याधुनिक नॅनो तंत्रज्ञान यातून विकसित जगातील एकमेव उपचार पद्धती
– नवीन औषध संशोधित (New Drug development) करण्याच्या जगातील बहुतेक निकषांना अनुसरून संशोधन
– संशोधनांमध्ये आधुनिक व आयुर्वेदिक तज्ञांचा समावेश
– सध्या जागतिक, सर्वोत्तम, अत्याधुनिक तसेच अंतिम समजल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग
-रुग्णाला सहज घरच्या घरी उपलब्ध होणारी चिकित्सापद्धती
– सुमारे ९५% रुग्णांना इतर चिकित्सा घेण्याची गरज भासली नाही.
– सदर औषध अमेरिका तसेच युरोपीय राष्ट्रांचे मान्यताप्राप्त पेटंट आहे
