विविध संस्कृतीचा सार म्हणजे गांधीजींच्या स्वप्नातला भारत – धीरेंद्र झा
पुणे : गांधी नावाचा धागा हा विविध जाती धर्माच्या लोकांना एक संघ बांधून ठेवण्यात मोठी भूमिका राहिली आहे. इतिहासातील विविध संस्कृतीचा सार हा गांधीजींच्या स्वप्नातला भारत घडवण्याच्या कल्पनेत होता असं मत लेखक व पत्रकार धीरेंद्र झा यांनी मांडले.
निमित्त होते लोकायत, ALERT आणि ज्ञानभारती प्रतिष्ठान आयोजित गांधी हत्येची ७५ वर्षे – गांधी मरत का नाहीत? या व्याख्यानाचे. पुढे ते म्हणाले की, आज गांधींच्या हत्येची 75 वर्ष होत आहेत पण गांधी हा विचार समजून घेण्यात त्याचा पुनर्शोध मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे गांधी हा विचार कधीच संपू शकत नाही. गांधींनी धर्माच्या पारंपारिक व्यक्तीला नवीन अर्थ देत सर्वसामान्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उतरवलं. विविध कृती कार्यक्रम देत माणसाला अस्पृश्यता स्त्री-पुरुष वेदाच्या पलीकडे जाऊन माणूसपणाकडे नेलं.
हे व्याख्यान सोमवार 2 ऑक्टोबर 2023 रोजी संध्या. 6 वा. संचेती हॉल, डॉ. नितु मांडके IMA हाऊस पुणे येथे झाले.
गांधींचा फोटो आज सर्व सरकारी कार्यालयात आहे पण त्यांचे विचार नाही घेतले त्यांना फक्त साफसफाईच्या चौकटीत बांधलं जात आहे ही मानसिकता बदलण्याची गरज आहे अशी खंत अलर्ट संस्थेच्या व राज्यसभेचे खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी मांडले. तर ज्ञानभारती प्रतिष्ठानचे ॲड. अभय छाजेड म्हणाले की, इतिहासातील गांधींच्या विविध घटना जोडून जर आपण जर विश्लेषण केलं तरच गांधी नावाचा विचार आपल्याला समजू शकेल. गांधीचा इतिहास सर्वांना सांगणार, महात्मा गांधी जिंदाबाद या घोषणा यावेळी देण्यात आल्या. वैष्णव जन तो हे महात्मा गांधींचं भजनही सर्वांनी सामूहिकपणे गायले. यासोबतच गांधीजींची शिष्या आणि ज्येष्ठ स्वांतत्र्यसेनानी रोहिणी गवाणकर लिखीत असे नेते असे अनुयायी हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. स्वांतत्र्यलढ्यात कष्टकरी महिला, जनतेचा सहभाग बद्दलची माहिती या पुस्तकात आहे. या व्याख्यानास राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, अर्बन सेलचे अंधुकशी नितीन कदम, लोकायतच्या समन्वयिका अलका जोशी, नितीन जाधव उपस्थित होते. नीरज जैन यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती.
