नेपाळमध्ये ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप, दिल्लीसह उत्तर भारत हादरला
नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्ली-एनसीआर परिसरामध्ये मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता ६.२ असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप केंद्राने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरने सांगितले की, नेपाळमध्ये आज दुपारी २:२५ वाजता भूकंप झाला. संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान या भूकंपाची तिव्रता किती होती तसेच भूकंपामुळे झालेल्या नुकसानीबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता खूप होती. अशा परिस्थितीत लोक घर आणि कार्यालयातून बाहेर पडले. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरने सांगितले की, भूकंपाची तीव्रता ६.२ होती आणि त्याचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये पाच किलोमीटर खोलीवर होता. राजस्थानच्या जयपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. येथे दुपारी २.५५ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोक घाबरले आणि इमारतींमधून बाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाणी गेले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार भूकंपाची तीव्रता ६.२ होती आणि त्याची खोली पाच किलोमीटर खाली होती.
