Thursday, July 30, 2026
BusinessLatest News

कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने सेबीकडे सादर केले डीआरएचपी

कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक ही वित्त वर्ष २०२३ मध्ये कासा डिपॉझिट्स, किरकोळ ठेवी, निधीवरील खर्चाच्या आधारावर देशातील स्मॉल फायनान्स बँकांमध्ये आघाडीची बँक ठरली असून, बँकेने आयपीओसाठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रोस्पेक्टस (डीआरएचपी) सादर केले आहे.

२०१६ मध्ये सुरू झालेली ही भारतातील पहिला स्मॉल फायनान्स बँक होती आणि बँकेचे इतर स्मॉल फायनान्स बँकांच्या तुलनेत विविध मातमत्तांमध्ये गुंतवणूक आहे आणि सर्व स्मॉल फायनान्स बँकांच्या तुलनेत सुरक्षित कर्जांचे प्रमाणही सर्वाधिक (९९.८२ टक्के) आहे. (Source: CRISIL MI&A Report).

आयपीओच्या माध्यमातून निधी उभारण्याची बँकेची योजना आहे. त्यासाठी १० रुपये दर्शनी मूल्य असलेले ४५० कोटी रुपयांचे शेअर्स वितरीत केले जाणार आहेत. यासाठी २४,१२,६८५ शेअर्स विकले जाणार आहेत.

या ऑफर फॉर सेलमधील २४,१२,६८५ शेअर्समध्ये ओमन इंडिया जॉइंट इन्व्हेस्टमेंट फंड २ यांच्या ८,३६,७२८ शेअर्सचा, पीआय व्हेंचर्स एलएलपीच्या ३,३७,३९६ शेअर्सचा, अॅमिकस कॅपिटल प्रायव्हेट इक्विटी १ एलएलपीच्या ६,०४,६१४ शेअर्सचा, अॅमिकस कॅपिटल पार्टनर्स इंडिया फंड १ च्या  ७०,१७८ शेअर्सचा (The “Investor Selling Shareholder”) आणि डीआरएचपीमध्ये नोंद केलेल्या इतर व्यक्तिंच्या (The “Other Selling Shareholders”) ५,६३,७६९ शेअर्सचा समावेश आहे.

प्री-आयपीओ प्लेसमेंट फेरीत 90 कोटी रुपये जमवण्याची कंपनीची योजना आहे. असे प्लेसमेंट प्रत्यक्षात झाल्यास नवीन ईश्यूचा आकार कमी होईल.

या नव्या इश्युच्या माध्यमातून जमा होणारा निधी बँकेच्या टिअर-१ भांडवी आधारासाठी वापरून बँकेच्या भविष्यातील निधीच्या गरजा पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय यातून निर्माण होणार निधी ऑफरसाठी होणाऱ्या खर्चावरही वापरला जाणार आहे.

नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (पूर्वाश्रमीची एडल्वाईड सेक्युरिटीज लिमिटेड), डीएएण कॅपिटल अॅडव्हायजर्स लिमिटेड आणि ईक्वीरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या या इश्युसाठी बूक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या माध्यमाथून जे शेअर्स वाटले जातील त्यांची नोत बीएसई लिमिटेड या एक्स्चेंजवर आणि राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईवर नोंदनीकृत केले जाणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading