मंजुल भारद्वाज लिखित ‘राजगति’ हे नाटक पहिल्यांदा मराठीमध्ये प्रस्तुत होणार
मंजुल भारद्वाज लिखित ‘राजगति’ हे नाटक पहिल्यांदा मराठीमध्ये प्रस्तुत होणार आहे. ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे.
राजकारण वाईट आहे! भ्रष्ट आहे ! माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही! I hate politics!” जेव्हा आपण रागाच्या भरात हे बोलतो तेव्हा आपल्याला माहित असते का ? की आपण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये राहतो?
आपला राजकारणाशी काही संबंध नसेल तर आपल्यावर राज्य कोण करणार? आपला राजकारणाशी काही संबंध नाही तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण कोण करणार?’ आम्ही भारताचे लोक’ म्हणजेच भारताचे मालक असण्याचे कर्तव्य कोण पार पाडणार?
आपण प्रामाणिक आहोत आणि नेता भ्रष्ट? या नेत्यांना कोण निवडून देतो, आपणच ना? ही शरमेची बाब आहे की, आपण सुशिक्षित असूनही देशाचे नेतृत्व करण्याऐवजी अशिक्षितांच्या इशार्यावर कठपुतली सारखे नाचतो. ऑक्सिजन, ऑक्सिजन करत रस्त्यावर मरून पडतो. अन्नाच्या एकेक दाण्यासाठी खितपत पडतो.रात्रंदिवस राज्यकर्त्यांचे खोटे ऐकतो आणि ‘सत्यमेव जयते’ ची स्वप्ने पाहतो!
चला जरा विचार करूया, की राजनैतिक प्रक्रियेविना विश्वातील सगळ्यात मोठी लोकशाही चालेल का ? नाही चालणार.. आणि जेव्हा ‘सभ्य’ नागरिक त्याला नाही चालवणार तर मग वाईट प्रवृत्तीचे लोक सत्ता चालवणार आणि तेच घडतं आहे..चला एक क्षण विचार करूया, की खरंच राजनीती वाईट आहे की आपण त्यात सहभागी न होऊन त्याला वाईट बनवत आहोत?..
आपण सगळे अपेक्षा करतो की, ‘गांधी, भगतसिंग, सावित्री आणि लक्ष्मी बाई’ या देशातच जन्माला यावे पण माझ्या घरात नाही ..
चला यावर मनन करू आणि ‘राजनैतिक व्यवस्थे’ ला शुद्ध आणि सार्थक बनवूया ! समता, न्याय, मानवता आणि संविधानिक व्यवस्था निर्माणासाठी ‘राजनैतिक परिदृश्य’ बदलण्याची चेतना जागवूया !
