Sunday, August 2, 2026
Latest NewsPUNE

‘प से पंचम आर. डी. बर्मन लाईव्ह’ऑर्केस्ट्राची रसिक प्रेक्षकांना पडली भुरळ

पुणे : ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत प से पंचम आर. डी. बर्मन लाईव्हहा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे हर्ट्झ म्युझिकच्या प्रख्यात गायिका श्रद्धा गायकवाड यांनी सहकलावंतांसमवेत सादर केला याचे संयोजन प्रख्यात गायिका श्रद्धा गायकवाड यांनी केले होते. कार्यक्रमाचे निवेदन आकाश सोळंकी यांनी केले.  यावेळीसभागृह रसिक प्रेक्षकांनी खचाखच भरले होते.

या कार्यक्रमात गायिका  श्रद्धा गायकवाड,सूर्या शिवरामन,लीना काळे,श्रद्धा कांबळेभाविका कुलकर्णी,अनुपमा कुलकर्णी आणि गायक प्रशांत साळवी उमेश कुलकर्णीअद्वैत लेलेहिमांशू शिवमआणि निखील देशपांडे यांनी संगीतकार आर. डी. बर्मन यांनी गायलेली व संगीत दिलेली लोकप्रिय गाणी सादर केली. यामध्ये मोनिका + दूनियामे लोगोंको,चला जाता हू,आओ ना गले लगाओ नानाम गुम जायेगा,एक लडकी को देखा तो ऐसा लगाहाय रे हाय तेरा घुंगटा,आजा आजा मे हू प्यार तेरा,ये जवानी है दिवानी,जाने जा ढूंढता अशी असंख्य लोकप्रिय गाणी सादर करण्यात आली. यातील इतर अनेक गाण्यांना प्रेक्षकांनी वन्स मोर दिला.

यावेळी गायकांना अमन सय्यद (सिंथेसायझर)ऋतुराज कोरे (ऑक्टोपॅडरीदम मशीन)हार्दिक रावल (लीड गीटार)लिजेश शशिधरन (बेस गिटार),श्रीपाद सोलापूरकर (सॅक्सोफोन) नितीन शिंदे (तबलातूंबा ,ढोलक),आयुष शेखर (ड्रम) यांनी वाद्यसंगत केली.

याप्रसंगी कमिटी मेंबर अतुल गोंजारीराजाभाऊ साठेमोहन टिल्लूश्रीकांत कांबळेनरेंद्र कातेराजेश सनगर  उपस्थित होते. 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading