आरती बंधूतेची समरसता गतीविधी तर्फे आरती बंधूतेची उपक्रम
पुणे : आरती बंधूतेची समरसता गतीविधी तर्फे आरती बंधूतेची हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत वंचित, मागास, पिछडा, अति पिछडा, स्वच्छता कर्मी अशा समाजातील व्यक्तींच्या हस्ते गणेश उत्सवनिमित्त श्री गणेश आरतीचे आयोजन करण्यात येत आहे . त्या अंतर्गत पुणे महानगरात देखील सामाजिक समरसता गतीविधीच्या वतीने पुण्यातील मानाचे गणपती मंडळामध्ये 21 दाम्पत्यांच्या हस्ते गणेश आरतीचे आयोजन करण्यात आले होते . त्यामध्ये पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, केसरीवाडा, गुरुजी तालीम,अखिल मंडई मंडळ , व महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्री दगडूशेट गणपती या मंडळांनी या उपक्रमास सहकार्य केले प्रत्येक मंडळात ४ ते ५ दाम्पत्यकडून आरती करण्यात आली.
लोकमान्य टिळकांनी बसवलेल्या विंचूरकर वाडा येथील प्रथम गणपती येथे एकत्रित आरती करण्यात आली.
विंचूरकर वाडा ट्रस्ट चे पाठारे, कसबा गणपतीच्या संगीता ठकार, दत्त मंदिर ट्रस्ट चे बलकवडे, माजी आमदार प्रकाश देवळे, ह भ प नारायण महाराज गोसावी,दुर्गम प्रतिष्ठानचे नंदू जाधव, केसरी उपसंपादक यांच्या उपस्थितीत दाम्पत्यांनी त्यांचे भावना व्यक्त केल्या. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दाम्पत्यांना शाल, श्रीफळ व चांदीचा गणपती भेट देण्यात आला. नंतर भोजन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. समरसता गतिविधि प्रांत संयोजक अभय ठकार यांनी संविधानाला अपेक्षित स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय याबाबत मत मांडले, समाजातल्या एक एक कुप्रथा संपवून आपण विकासाचा मार्गाने जात आहोत . नारायण महाराज गोसावी यांनी आपल्या समाजातील दुर्लक्षित वंचित राहिलेले आपले समाज बांधव यांना आपण मान सन्मान दिला पाहिजे व आता वरील गोष्टींचा मनापासून स्वीकार समाजात होताना दिसतो आहे असे सांगितले. . कार्यक्रमाचे संयोजन डॉक्टर प्रसाद खंडागळे, व रवी ननावरे यांनी केले तसेच तसेच या कार्यक्रमास पुणे महानगर संयोजक शरद शिंदे , मनोज भालेराव, राजेश पवार, अविनाश वाघमारे, यांनी सहकार्य केले .
