सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देणारे खडकीतील राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळ
पिंपरी : खडकी रेंजहिल्स येथील राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळ यंदा पस्तीसावे वर्ष साजरे करीत असून, आकर्षक गणेशमूर्ती आणि रोषणाई गणेश भक्तांना आकर्षित करीत आहे. मंडळ साधेपणाला प्राधान्य देत आलेले आहे.
राष्ट्रीय मित्र मंडळ वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविते. यंदा मंडळाने आकर्षक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ओंकार राजू आसवले हे अध्यक्ष आणि अंजिक्य शेलार हे उपाध्यक्ष आहेत.
आकर्षक विद्युत रोषणाईने तेजोमय प्रकाशात गणपती मूर्ती उजळून निघालेली आहे. आकर्षक श्रीगणेशाची मूर्ती हेही मंडळाचे वेगळेपण आहे. या ठिकाणी भक्तिमय वातावरण दिसून येत आहे.
विविध परिसरातून बालचमू, नागरिक दर्शनासाठी येत असतात. मंडळाची दरवर्षी विसर्जन मिरवणूकही डोळ्याचे पारणे फेडणारी असते. मंडळाने कोरोना काळात गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, पूरग्रस्तांना मदत आदी विविध उपक्रम राबविले आहेत.
