युटीआय म्युच्युअल फंडातर्फे ‘युटीआय इनोव्हेशन फंड’ लाँच
युटीआय म्युच्युअल फंडाने (युटीआय) युटीआय इनोव्हेशन फंड ही ओपन- एंडेड इक्विटी योजना लाँच केली असून इनोव्हेशन- नाविन्यावर आधारित ही योजना गुंतवणुकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये अत्याधुनिकता आणण्याच्या हेतूने बनवण्यात आली आहे. हा फंड नाविन्यावर आधारित व्यवसाय तसेच चौकटीबाहेर पडून विकास करण्याची क्षमता असलेल्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बॉटम- अप दृष्टीकोनाचा आधार घेणार आहे. याचा एनएफओ २५ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू होणार असून ९ ऑक्टोबर २०२३ रोजी बंद होईल.
या फंडाचे गुंतवणूक धोरण तीन स्तंभांवर आधारित आहे – नाविन्य – उत्पादनक्षमता विकसित करण्यासाठी किंवा पर्यावरणीय/सामाजिक परिणाम साधण्यासाठी नाविन्याचा आधार घेणाऱ्या कंपन्या, विकास – लक्षणीय विकास क्षमता असलेल्या कंपन्या, बाजारपेठ विकास करण्याची क्षमता सिद्ध केलेल्या किंवा बाजारपेठेत हिस्सा मिळवणाऱ्या कंपन्या, दर्जा – बाजारपेठेत आघाडीच्या स्थानावर कार्यरत असलेल्या आर्थिकदृष्ट्या बळकट कंपन्या, दमदार व्यावसायिक मॉडेल्स, दर्जा व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट प्रशासन.
या फंडाने संभाव्य गुंतवणूक संधींमध्ये गुंतवणूक करण्याचे ध्येय ठेवले असून या संधी ईकॉमर्स, सॉफ्टवेयर, फिनटेक, स्पेशॅलिटी रसायने, क्लीन टेक, आरोग्यसेवा, खाद्यपदार्थ तंत्रज्ञान, डिजिटल जाहिरात कंपन्या इत्यादीपुरत्या मर्यादित नाहीत. नाविन्यावर लक्ष केंद्रित करण्याने फंडाचा सक्रिय हिस्सा मोठा असेल, मात्र या फंडाने जोखीम व्यवस्थापन फ्रेमवर्कचा आधार घेऊन पोर्टफोलिओतील जोखीम – केंद्रीकरण आणि क्रांतीकारीपणा यांचे व्यवस्थापन करण्याचे ध्येय ठेवले आहे.
युटीआय एएमसीचे फंड व्यवस्थापक अंकित अगरवाल लाँचविषयी म्हणाले, ‘युटीआय इनोव्हेशन फंड गुंतवणूक संधींच्या जगात मार्ग शोधत असलेल्या गुंतवणुकदारांसाठी मोठे पाऊल आहे. हा अनोखा पोर्टफोलिओ, नावाला साजेसा, नाविन्यपूर्ण आणि क्रांतीकारी व्यवसायांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करणारा आहे. तंत्रज्ञानातील वेगवान सुधारणा आणि सातत्याने बदलत असलेली बाजारपेठेची समीकरणे यांच्या जगात नाविन्याचा, बदलाचा स्वीकार करण्याची आणि संपत्तीची निर्मिती करू शकणाऱ्या संभाव्य व्यवसायांमध्ये सहभागी होण्याची ही संधी आहे.’
गुंतवणुकदारांनी या फंडात किमान तीन ते पाच वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करावा. संपूर्ण चक्रादरम्यान पोर्टफोलिओ कंपन्यांच्या संभाव्य एकमार्गी नसलेल्या विकासापासून लाभ करून घ्यायचा असेल, तर गुंतवणुकदारांनी दीर्घ काळात गुंतवणूक कायम ठेवणे आवश्यक आहे.
युटीआय इनोव्हेशन फंडाची प्रमुख वैशिष्ट्ये
- कोणासाठी योग्य
o नावाप्रमाणेच नाविन्यपूर्ण, मापदंड ठरलेल्या व संशोधनाचा पाया लाभलेल्या फंडात फडात गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्या गुंतवणुकदारांसाठी
o उच्च विकास क्षमतेच्या शोधात असलेल्या आणि नाविन्याची साथ देण्याची इच्छा असलेल्या गुंतवणुकदारांसाठी
o गुंतवणुकदारांना दीर्घकाळासाठी एकदम मोठी रक्कम किंवा टप्प्याटप्प्याने (एसआयपी/एसटीपी) गुंतवणूक करता येईल.
- फंड व्यवस्थापक
अंकित अगरवाल
- अर्जाची किमान रक्कम
o प्राथमिक खरेदी: रू. ५००० किंवा त्यानंतर १ रुपयाच्या पटीत
o अतिरिक्त खरेदी: रू. १००० किंवा त्यानंतर १ रुपयाच्या पटीत
- अधिभाराची आखणी
o प्रवेश भार: नाही
o निर्गमन भार: विभाजनानंतरच्या १२ महिन्यांत रीडीम किंवा स्विच केल्यास १ टक्के व त्यानंतर काही नाही.
वरील निर्गमन भार सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी) आणि सिस्टिमॅटिक ट्रान्सफर इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसटीआरआयपी) यांसह सर्व रिडम्प्शन्स/स्विच- आउट व्यवहारांसाठी लागून आहे.
- बेंचमार्क इंडेक्स
o निफ्टी ५०० टीआरआय
उत्पादन लेबल आणि रिस्कोमीटर
युटीआय इनोव्हेशन फंड
नाविन्य संकल्पनेचा पाठपुरावा करणारी ओपन एंडेड इक्विटी योजना
नोट: न्यू फंड ऑफरदरम्यान (एनएफओ) करण्यात आलेले उत्पादनाचे लेबलिंग योजनेची वैशिष्ट्ये किंवा मॉडेल पोर्टफोलिओ यांच्या अंतर्गत विश्लेषणावर आधारित असते व गुंतवणूक झाल्यानंतर एनएफओनंतर त्यात बदल होऊ शकतात.
