Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Big News : भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आरतीसाठी आले असताना लागली मोठी आग

पुणे : शहरातील आंबीलोढा कॉलनी नजीक साने गुरूजी नगर येथे साने गुरुजी  गणपती मंडळाने महाकाल मंदिराची सजावट केलेल्या प्रतिकृतीच्या कळसाच्या वरील बाजूस अचानक काही वेळा पूर्वी आग लागली होती. याठिकाणी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आरतीसाठी आले असताना देखाव्याच्या  कळसाला अचानक आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाकडून दोन फायरगाड्या व एक वाॅटर टँकर घटनास्थळी पोहोचला असून आग आटोक्यात आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.जे पी नड्डा हे सुखरूप तेथून बाहेर पडलेले आहेत.

दरम्यान साने गुरुजी मंडळाचे अध्यक्ष आणि भाजपचे शहराध्यक्ष धिरज घाटे यांनी आग आटोक्यात आली असून अफवांवर विश्वास ठेऊ नये असे अवहान केले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading