Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले मुंबईतील विविध गणपतीचे दर्शन

मुंबई :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांच्यासोबत होते.

केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी सपत्नीक लालबागच्या राजाची पूजा केली. यावेळी लालबाग राजा गणेश मंडळाच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी, खजिनदार मंगेश दळवी यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार आशीष शेलार, विनोद तावडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्री. शाह यांचे गणेश मूर्ती शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा सौ. वृषाली शिंदे यांनी शाह यांचे औक्षण केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी .शाह यांचे श्रीकृष्णमूर्ती, शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा फडणवीस उपस्थित होते.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दुपारी वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे सपत्नीक दर्शन घेत विधिवत पूजा केली.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार, मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading