कर्मवीर भाऊराव पाटील यांना यशस्वी संस्थेच्यावतीने अभिवादन
पुणे : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्याला यशस्वी संस्थेचे मुख्य वित्त अधिकारी देविदास माळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला शिक्षण घेण्याची संधी देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनकाळात केलेले कार्य हे आजही आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक व मार्गदर्शक आहे,असे मत यावेळी यशस्वी संस्थेचे मुख्य वित्त अधिकारी देविदास माळी यांनी व्यक्त केले.
