Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

हिंद युवक मित्र मंडळच्या वतीने गरजू मुलांना शालेय साहित्य

पुणे : हिंद युवक मित्र मंडळच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत ‘वसा शिक्षणाचा आशिर्वाद बाप्पाचा’ या उपक्रमाअंतर्गत गरजू मुलांना संपूर्ण शालेय साहित्य भेट देण्यात आले. शैक्षणिक मदत करीत विद्येची देवता असलेल्या गणरायाची ही आगळीवेगळी उपासना करण्यात आली.

गुरुवार पेठेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अलका फाउंडेशनमधील गरजू मुलांना यावेळी मदत करण्यात आली. पोलीस उपायुक्त संदीप सिंह गील, सामाजिक कार्यकर्ते राम बांगड, शिरीष मोहिते,प्रतिभाताई ढमाले, दिलीप काळोखे, आप्पा मणेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच मंडळाचे केतन भागवत, रोहित शिंदे, अथर्व इंदलकर, सुमित काची, राहुल महांगरे, हरीश मेमाणे ,रवींद्र मेमाणे, संग्राम साळुंखे. रमेश चोरगे, गौरव मळेकर, रोहन शिंदे ,मयूर चौधरी, कुणाल येवले, शुभम दातरंगे, संजय शिंदे संतोष शिंदे, सचिन शिंदे, सचिन चौधरी, मनोज शेलार, निलेश शेलार, वेदांत चौधरी, तन्मय पारेकर, प्रथमेष भागवत, हितेश दवे, समर्थ पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

केतन भागवत म्हणाले, दरवर्षी गणपती उत्सवात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा आमचा प्रयत्न असतो. गणपती ही विद्येची देवता आहे, त्यामुळे या माध्यमातून त्याची केली जाणारी पूजा ही नक्कीच त्याला आवडणारी आहे. अनेक मुलांना अभ्यास करताना शैक्षणिक साहित्य नसल्याने अडचणी येतात. त्यामुळे मंडळातर्फे केलेली मदत त्यांच्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.

फोटो ओळ – हिंद युवक मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत ‘वसा शिक्षणाचा आशिर्वाद बाप्पाचा’ या उपक्रमाअंतर्गत गरजू मुलांना संपूर्ण शालेय साहित्य भेट देण्यात आले. गुरुवार पेठेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading