PMP : हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्टेशन व मुंढवा चौक ते केसनंद फाटा (वाघोली) हे दोन मार्ग होणार सुरु.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून शुक्रवार दि. २२/०९/२०२३ पासून हडपसर रेल्वे स्टेशन वरून शहरात येणाऱ्या व शहरातून हडपसर रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या प्रवासी यांच्यासाठी बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणी नुसार पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून शुक्रवार दि. २२/०९/२०२३ पासून मार्ग क्र. १५६ या मार्गावरील शेड्युलला हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्टेशन (मार्गे – मगरपट्टा, मुंढवागाव, मुंढवा चौक, लोणकर कॉलनी) पर्यंत काही खेपा देण्यात आलेल्या आहेत. तसेच मुंढवागांव व वाघोली परिसरातील प्रवाशांच्या सोईसाठी मार्ग क्र. १९८ मुंढवा चौक ते केसनंद फाटा (वाघोली) असा मार्ग सुरु करण्यात येत आहे. (मार्गे – माळवाडी मांजरी, आव्हाळवाडी, सातवपार्क, वाघोली बाजार) हे दोन
बस मार्ग सुरु करण्यात येणार आहेत.
अ.क्र
.
मार्ग क्र. पासुन – पर्यंत मार्गाचा तपशील वारंवारिता
१. १५६ हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्टेशन मगरपट्टा, मुंढवागाव, मुंढवा चौक, लोणकर कॉलनी. रेल्वेच्या वेळेनुसार
२. १९८ मुंढवा चौक ते केसनंद फाटा (वाघोली)माळवाडी मांजरी, आव्हाळवाडी, सातवपार्क, वाघोली बाजार. १ तास
सदर बस मार्ग सुरु होत असल्याने हडपसर रेल्वे स्टेशन वरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना किफायतशीर दरात सुरक्षित सेवा उपलब्ध होणार आहे, तरी जास्तीत-जास्त प्रवासी नागरिकांनी या बस सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
