हॉर्नेट २.० आणि डिओ १२५ ची २०२३ रेप्सोल एडिशन लाँच
नवी दिल्ली – पहिल्या ग्रँड प्रिक्स ऑफ भारतसाठी सज्ज होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि होंडाच्या रेसिंग वैशिष्ट्यांचा थरार स्ट्रीट रायडिंगमध्ये अनुभवता यावा म्हणून होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आज हॉर्नेट २.० आणि डिओ १२५ ची २०२३ रेप्सोल एडिशन लाँच केली. या दोन्ही गाड्यांची किंमत अनुक्रमे रू. १‚४०‚००० आणि रू. ९२‚३०० असून रेप्सोल मॉडेल्सची नवीन मर्यादित आवृत्ती देशभरातील सर्व होंडा रेड विंग वितरकांकडे उपलब्ध होणार आहे.
एचएमएसआयच्या नव्या उत्पादनांविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, ‘रेसिंग हे होंडाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मोटरसायकल रेसिंगचा कळस मानले गेलेले मोटो जीपी पहिल्यांदाच भारतात आयोजित केले जात असून हा इतिहास घडताना पाहाण्यासाठी भारतीय चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा थरार आणखी द्विगुणित करण्यासाठी आम्ही हॉर्नेट २.० आणि डिओ १२५ ची २०२३ रेप्सोल एडिशन लाँच केली आहे. आगामी भारतजीपीच्या यशासाठी आमच्याकडून शुभेच्छा.
२०२३ रेप्सोल मर्यादित आवृत्तीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक योगेश माथुर म्हणाले, ‘हॉर्नेट २.० आणि डिओ १२५ ची २०२३ रेप्सोल एडिशन लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. या मर्यादित आवृत्तीच्या माध्यमातून भारतातील मोटोजीपी चाहत्यांसाठी होंडाचा रेसिंग डीएनए नेहमीच्या रायडिंगसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. पहिल्या भारतजीपीसाठी रेप्सोल होंडा टीमला आमच्याकडून भरपूर शुभेच्छा.’

डिओ १२५: Dio Wanna Have Fun?
होंडा डिओ १२५ रेप्सोल एडिशनमध्ये रॉस व्हाइट आणि व्हायब्रंट ऑरेंज या रंगाचा स्टायलिश ड्युएल- टोन साधण्यात आला आहे. याचे स्पोर्टी फ्रंट डिझाइन व एलईडी हेडलॅम्प आणि लॅम्पसाठी देण्यात आलेली खास जागा यामुळे एकंजर स्टाइल उंचावते. याचे ब्लॅक्ड- आउट ड्उएल टिप मफलर स्पोर्टी डीएनए उंचावणारे असून दमदार एक्झॉस्ट नोटची निर्मिती करते.
स्प्लिट ग्रॅबरेलसह आधुनिक टेल लॅम्प, वेव डिस्क ब्रेक आणि ऑरेंज अलॉय व्हील्स तसेच ठळक लोगो यांमुळे ही मोटो स्कूटर तरुणांना आकर्षित करेल. डिओ १२५ चे नवे ग्राफिक्स होंडाचा समृद्ध वारसा दर्शवणारे असून त्यात होंडा स्मार्ट की आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आले आहे.
होंडाच्या स्मार्ट व स्टायलिश डिओ १२५ मध्ये १२३.९२ सीसी , ४ स्ट्रोक, सिंगल सिलेंडर बीएसव्हीआय ओबीडी२ चे पालन करणारे पीजीएम- एफआय इंजिन देण्यात आले आहे, जे ६.०९ केडब्ल्यू आणि १०.४ एनएम देते. प्रत्येक प्रवास आरामदायी व सुरक्षित होण्यासाठी यात इक्विलायझरसह कॉम्बी- ब्रेक सिस्टीम (सीबीएस), १२ इंची फ्रंट व्हील आणि टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि ३ स्टेप अडजस्टेबल रियर सस्पेन्शन देण्यात आले आहे.
हॉर्नेट २.० – वाऱ्यावर स्वार व्हा
नव्या होंडा हॉर्नेट २.० रेप्सोल एडिशनमध्ये अत्याधुनिक ग्राफिक्ससह आक्रमक डिझाइन देण्यात आले आहे. त्यामध्ये रॉस व्हाइट आणि व्हायब्रंट ऑरेंज या रंगाचा स्टायलिश ड्युएल- टोन बॉडी पॅनेल्स व अलॉय व्हील्सवर रेप्सोल रेसिंग स्ट्राइप्ससह देण्यात आला आहे. हॉर्नेट २.० चे पुढे झुकणारे एयरोडायनॅमिक स्टायलिंग आणि दमदार फ्युएल टँक राकट व दमदार लूक देते.
संपूर्ण एलईडी लायटिंग सिस्टीममुळे (एलईडी हेडलॅम्प, एलईडी विंकर्स आणि एक्स शेप्ड एलईडी टेल लॅम्प) स्टायलिंग आणखी उठावदार झाले आहे, तर स्पोर्टी स्पिल्ट सीट आणि की ऑन टँकची खास जागा या गाडीचे स्ट्रीट फायटर व्यक्तिमत्त्व खुलवत आहे. आधुनिक पूर्णपणे डिजिटल लिक्विड क्रिस्टल इन्स्ट्रुमेंट पॅनेलवर रायडरसाठी विविध प्रकारची माहिती आणि दिवसा किंवा रात्री चांगल्या दृश्यमानतेसाठी ५ स्तरीय कस्टमायझेबल ब्राइटनेस देण्यात आला आहे.
दमदार १८४.४० सीसी, ४ स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर बीएसव्हीआय ओबीडी२ चे पालन करणारे पीजीएम- एफआय इंजिन १२.७० केडब्ल्यू आणि १५.९ एनएम यांसह हॉर्नेट २.० थरारक कामगिरी करते. यात देण्यात आलेल्या नव्या असिस्ट स्लिपर क्लचमुळे अपलिफ्ट सोपे होते व डिअक्सलरेट करताना हार्ड डाउन शिफ्टवर रियर व्हीलचे लॉक अप योग्य प्रकारे केले जाते. यामुळे रायडरची सुरक्षा उंचावते.
अधिक चांगल्या नियंत्रणासाठी हॉर्नेट २.० रेप्सोल एडिशनमध्ये ड्युएल पेटल डिस्क ब्रेक्स आणि सिंगल चॅनेल एबीएस देण्यात आले आहे. मोनो शॉक रियर सस्पेन्शनमुळे गुरुत्वाकर्षणाचे केंद्र राखण्यास मदत होते, कॉर्नरिंग करताना चांगले स्थैर्य मिळते तसेच रायडिंगचा अनोखा अनुभव घेता येतो.
खास किंमत
नव्या २०२३ होंडा डिओ १२५ रेप्सोल एडिशनची किंमत रू. ९२‚३०० आणि होंडा हॉर्नेट २.० रेप्सोल एडिशनची किंमत रू. १‚४०‚००० (एक्स शोरूम दिल्ली) ठेवण्यात आली आहे. एचएमएसआयद्वारे या उत्पादनांवर खास १० वर्षांची वॉरंटी (२ वर्षांची स्टँडर्ड + ७ वर्षांची पर्यायी) देण्यात येणार आहे.
| मॉडेल | किंमत (एक्स शोरूम दिल्ली) |
| होंडा डिओ १२५ रेप्सोल एडिशन | किंमत. ९२‚३०० |
| होंडा हॉर्नेट २.० रेप्सोल एडिशन | किंमत. १‚४०‚००० |
