fbpx
Monday, October 2, 2023
ENTERTAINMENTLatest News

सुपरस्टार थलपती विजयचा ‘थूपाकी’ मराठीत OTT वर

आपल्या विशेष अभिनय कौशल्यासाठी ओळखला जाणारा तमिळ चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता ‘सुपरस्टार थलपती विजय’ याचा जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘थूपाकी’ २५ सप्टेंबर पासून, महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर आता मराठीत पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाची कथा एका सैनिकाभोवती फिरते जो आपली ड्यूटि संपवून घरी सुट्टीसाठी परतला आहे. सुट्टीच्या काळात त्याच्या पोलिस मित्रासोबत फिरत असताना, एक दहशतवादी टोळी जी मुंबई शहराला उद्ध्वस्त करू पाहत आहे, त्याची त्याला चाहूल लागते. पुढे जे काही होतं ते दिग्दर्शक मुरगुडूस यांनी विलक्षण मांडलं असून विजयने सैनिकाची उल्लेखनीय भूमिका साकारली आहे.

“आम्ही सातत्याने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची गरज आणि त्यांची बदलती आवड जपण्याच्या प्रयत्नात असतो. म्हणूनच ‘अल्ट्रा  झकास’ ओटीटीच्या  माध्यमातून ‘थूपाकी’ सारखा सुपरहिट  चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मराठीमध्ये रूपांतर करून आम्ही  घेऊन येत आहोत. चित्रपटाला भरभरून प्रेम मिळेल याची खात्री वाटते.” असे अल्ट्रा  मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सीईओ  सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: