होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे रस्ते सुरक्षा जागरूकता कॅम्पेनचे आयोजन
पुणे – भारतात सुरक्षितपणे वाहन चालवण्याची संस्कती रूजवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असलेल्या होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आपल्या नॅशनल रोड सेफ्टी अवेयरनेस कॅम्पेनचे महाराष्ट्रातील पुणे शहरात आयोजन केले होते.
रस्त्यावर असताना सुरक्षा कशी जपायची याविषयी होंडा जगभरात प्रसार करत असते. पिंपरी चिंचवड पॉलीटेक्नीक अँड एसय बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, पुणे (महाराष्ट्र) येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय कार्यक्रमात एचएमएसआयने २००० विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षितपणे वाहन चालवण्याविषयी जागरूकता निर्माण केली. कंपनीच्या रोड सेफ्टी इन्स्ट्रक्टर्सनी वयोगटाला साजेसे रोड- सेफ्टी लर्निंग प्रोग्रॅमचा वापर करत सहभागी झालेल्या सर्वांना रस्त्यावर सुरक्षा कायम राखण्याचे महत्त्व समजेल याची काळजी घेतली.
गेल्या २२ वर्षांपासून एचएमएसआयने महाराष्ट्रात ३.७ लाख प्रौढ आणि मुलांना रस्त्याचा जबाबदारीने वापर कसा करावा तसेच सुरक्षितपणे वाहन कसे चालवावे याचे शिक्षण दिले आहे.
अपघातमुक्त भारत उभारण्याच्या एचएमएसआयच्या बांधिलकीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या एचआर, अडमिन, आयटी व कॉर्पोरेट अफेयर्स विभागाचे वरिष्ठ संचालक श्री. विनय धिंग्रा म्हणाले, ‘भविष्यात रस्त्याचा वापर करणार असलेल्या नव्या पिढीला शिक्षित करण्यावर एचएमएसआयचा भर आहे. तरुणांमध्ये सकारात्मक वृत्ती आणि रस्त्यावरील सुरक्षेबाबत शिस्त रूजवण्याची मोहीम आम्ही हाती घेतली आहे. रस्त्यावरील सुरक्षेला प्राधान्य देणारा, रस्त्यावर जबाबदारीने वर्तन करणारा समाज निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. ते पूर्ण करण्यासाठी वाहनचालकांना सक्षम व शिक्षित करून सुरक्षितपणे रस्त्याचा वापर करण्यास प्रेरणा देण्याचे काम आम्ही करत आहोत. त्यासाठी अनुकूल मानसिकता विकसित करण्यासाठी एचएमएसआयने देशभरात रोड सेफ्टी अवेयरनेस प्रोग्रॅम लाँच करण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे.’
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाची रस्ते सुरक्षाप्रती सीएसआर बांधिलकी
जगभरात होंडा रस्ते सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येते. एप्रिल २०२१ मध्ये जाहीर करण्यात आल्याप्रमाणे ‘होंडाने २०५० पर्यंत जागतिक पातळीवर होंडा मोटरसायकल्स आणि वाहनांचा समावेश असलेले अपघात शून्यावर आणण्याचे ध्येय ठेवले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे, २०३० पर्यंत आपल्या मुलांमध्ये रस्त्यावरील सुरक्षेविषयी सकारात्मक मानसिकता रूजवणे आणि त्यानंतरही त्यांना शिक्षण देत राहाणे. मुलांमध्ये स्वतःच्या जीवाची काळजी करण्याबरोबरच इतरांच्या जीवांची पर्वा करण्याची वृत्ती त्यांच्यात रूजवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सुरक्षितपणे वाहन चालवणे कुल आणि ट्रेंडी असून कोणत्याही परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये हा दृष्टीकोन त्यांच्या रुजवायचा आहे. हे साध्य करण्यासाठी आम्ही सातत्याने देशभरातील शाळा व कॉलेजेसमध्ये रस्ते सुरक्षा उपक्रमांचे आयोजन करतो.
हे रोड सेफ्टी अवेयरनेस प्रोग्रॅम्स संवादी, गुंतवून ठेवणारे आणि लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांना आवडतील असे आहेत. शाळा, कॉलेज, सरकारी संस्था आणि बिगरसरकारी संस्थांमध्ये त्यांचे आयोजन केले जाते. संवादी गेम्स, रोल प्लेइंग, व्हर्च्युअल अनुभव यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबवले जातात. रस्त्यावरील सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि आणि रस्त्यावर जबाबदार पद्धतीने वागण्यास प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येय आहे. आतापर्यंत हा जागरूकता उपक्रम ५.७ लाख भारतीयांपर्यंत पोहोचला आहे. कुशल सेफ्टी इन्स्ट्रक्टर्सची आमची टीम भारतभरात आमचे १० दत्तक ट्रॅफिक ट्रेनिंग पार्क्स आणि ६ सेफ्टी ड्रायव्हिंग एज्युकेशन सेंटर्समध्ये (एसडीईसी) रोज हे उपक्रम राबवते. एचएमएसआयतर्फे पुढील पद्धतींच्या मदतीने रोड सेफ्टी अवेयरनेस प्रोग्रॅम आयोजित केले जातात –
- वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेले लर्निंग मोड्युल– होंडाच्या कुशल मार्गदर्शकांनी रस्त्यावरील चिन्हे आणि खुणा, रस्त्यावरील चालकाचे कर्तव्य, रायडिंग गियर आणि स्थिती आणि सुरक्षितपणे गाडी चालवण्याचे तंत्र यांवर थिअरी सत्र तयार केले आहे.
- प्रत्यक्ष शिक्षण: होंडाच्या व्हर्च्युअल रायडिंग स्टिम्युलेटरवर खास प्रशिक्षण देत सहभागींना प्रत्यक्ष गाडी चालवण्यापूर्वी रस्त्यावरच्या संभाव्य १०० धोक्यांचा अनुभव देण्यात आला.
- संवादी सत्र: सहभागींना किकेन योसोकु ट्रेनिंग (केवायटी) हे धोक्याचा अंदाज लावण्याचे तंत्र शिकवण्यात आले,ज्यामुळे धोक्याविषयी रायडर/चालकाची धोका ओळखण्याची क्षमता तीव्र होते व रस्त्यावरील वाहन चालवताना सुरक्षेला प्राधान्य दिले जाते.
- सद्य चालकांसाठी रायडिंग कौशल्य विकास– आधीपासून वाहन चालवत असलेले विद्यार्थी आणि कर्मचारी यांना स्लो रायडिंग उपक्रम व अरूंद फळ्यांवर वाहन चालवत प्रशिक्षण देण्यात आले.
- मजेदार पद्धतीने शिक्षण:रस्त्यावरील सुरक्षेची माहिती कायम लक्षात राहावी यासाठी होंडाने रोड सेफ्टी गेम्स आणि प्रश्नमंजुषांचे आयोजन केले.