Sunday, July 26, 2026
BusinessLatest News

प्रिमियम मेन्सवेअर ब्रॅण्ड सेलिओने पुण्यामध्ये केले फॅशनमधील नवप्रवाह प्रस्थापित करणाऱ्या आपल्या कॉन्सेप्ट स्टोअरचे उद्घाटन 

पुणे– विख्यात फ्रेंच मेन्सवेअर ब्रॅण्ड सेलिओला हे जाहीर करण्यास अत्यंत आनंद होत आहे की पुणेमहाराष्ट्र येथे कंपनीच्या पहिल्या नव्या कॉन्सेप्ट स्टोअरचा बहुप्रतिक्षित उद्घाटन समारंभ संपन्न झाला आहे. उत्सुकता वाढविणारे हे नवे स्टोअर शहरातील आधुनिक फॅशन जपणाऱ्या पुरुष ग्राहकांसाठी एक प्रगत अनुभव देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. या स्टोअरने १ सप्टेंबर २०२३ रोजी आपल्या पहिल्यावहिल्या ग्राहकांचे स्वागत केले.

मनावर छाप पाडणाऱ्या २१०० चौ. फूटांच्या विस्तृत जागेवर उभारण्यात आलेले हे नवीन स्टोअर कपडे आणि अॅक्सेसरीजची विस्तृत आणि वैविध्यपूर्ण उत्पादनश्रेणी सादर करतआजच्या आधुनिक पुरुषाला फॅशनचे उंची पर्याय पुरविण्याप्रती सेलिओची बांधिलकी नेमकेपणाने व्यक्त करत फॅशनप्रेमींसाठीच्या वर्दळीची जागा बनण्यास सज्ज आहे.

या स्टोअरच्या उद्घाटनामुळे सेलिओचे भारतातील तिसरे नवे कॉन्सेप्ट स्टोअर सुरू झाले आहे. याआधी हैदराबाद आणि बेंगळुरू येथेही अशाच प्रकारच्या स्टोअरचे उद्घाटन यशस्वीपणे संपन्न झाले होते. पुण्यातील स्टोअर मात्र महाराष्ट्र राज्यातील अशाप्रकारचे पहिलेच स्टोअर म्हणून विशेष उठून दिसणारे आहेज्यामुळे खरेदीचा नाविन्यपूर्ण अनुभव देशभरात विस्तारण्यासाठी सेलिओकडून समर्पित भावनेने केले जाणारे काम अधोरेखित झाले आहे. हे सेलिओचे भारतातील ६०वे स्टोअर आहे ही गोष्टही या यशामुळे ठळकपणे नोंदवली गेली आहे आणि देशातील एक अग्रगण्य फॅशन ब्रॅण्ड ही कंपनीची ओळख अधिक भक्कम झाली आहे.

फ्रान्समधील सेलिओद्वारे प्रथम प्रस्थापित केल्या गेलेल्या संकल्पनेवर आधारित असलेले हे नवीन कॉन्सेप्ट स्टोअर पेहराव आणि अॅक्सेसरीजचे अधिकच विस्तृत व अधिक वैविध्यपूर्ण कलेक्शन ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी अधिक मोठे दालन घेऊन आले आहे. दर्जाशैली आणि सुविधा या गोष्टींच्या शोधात असलेल्या फॅशनविषयी जागरुक पुरुषांच्या कपडे खरेदीच्या सर्व गरजा एकाच ठिकाणी पुरविण्याच्या सेलिओच्या ध्येयधोरणाशी हा दृष्टीकोन मेळ साधतो. नव्या स्टोअरमध्ये सेलिओचे ऑटम विंटर २०२३ कलेक्शन मांडले जाणार आहेज्यात फ्रेंच फॅशनडिझाइन आणि कापड यांतील नवीनतम प्रवाहांचा समावेश असेल, जे येत्या मोसमात मेन्स फॅशनची व्याख्या नव्याने घडवतील.

ऑटम विंटर २०२३ कलेक्शनमध्ये ड्रॅगन बॉल झेड कलेक्शननारुतो आणि TMNT यांच्यासह अनेक अधिकृत परवानाप्राप्त मर्चंडाइजच्या आगळ्यावेगळ्या संग्रहाचा समावेश असेल. त्यामुळे या प्रचंड लोकप्रिय फ्रँचाइझींशी संबंधित उत्पादने त्यांच्या चाहत्यांना मिळू शकतील. सेलिओच्या उत्तम फिटिंग असलेल्या व आरामदायी आणि इटालियन फॅशनमधील कालातील डौलदारपणा प्रदर्शित करणाऱ्या प्रिमियम इटालियन जीन्सच्या साथीने ग्राहकांना आपला डेनिम गेम एका नव्या उंचीवर नेता येईल.

आपल्या नव्या स्टोअरच्या उद्घाटनाविषयी बोलताना सेलिओ इंडियाचे सीईओ सत्येन मोमाया म्हणाले, “आधुनिक भारतीय पुरुष वर्गासमोर फॅशनच्या पर्यायांचा एक विस्तृत पट सादर करणारे आमचे क्रांतीकारी कॉन्सेप्ट स्टोअर पुण्यामध्ये आणण्याबद्दल आम्ही अत्यंत उत्साही आहोत. ही नवी जागा म्हणजे पुण्यातील आमचे सर्वात नवे कॉन्सेप्ट स्टोअर आहे, जिथे ग्राहकांना एक आगळावेगळा आणि अतुलनीय असा खरेदी-अनुभव मिळू शकेल. आमच्याकडून ऑटम-विंटर २०२३ कलेक्शन सादर केले जात असताना परिधानांच्या या उत्साहाने भारलेल्या साहसी सफरीवर आमच्यासोबत येण्याचे आमंत्रण आम्ही आपल्याला देत आहोत.

पुण्यातील नव्या स्टोअरच्या भव्य उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण सेलिओने सर्व फॅशनप्रेमींना दिले आहे. आजच्या चोखंदळ श्रीमानांची वैविध्यपूर्ण अभिरूची आणि प्राधान्यक्रम सांभाळणाऱ्या शैलीदार कपड्यांची आणि अॅक्सेसरीजची विस्तृत श्रेणी धुंडाळण्यासाठी सज्ज रहा. कार्गो पॅण्ट्स आणि नवप्रवाहांचे प्रतिबिंब असलेल्या प्रिन्ट्सनी सजलेल्या शर्टसच्या आमच्या विस्तृत श्रेणीच्या साथीने फॅशनमधील ताजे प्रवाह आपलेसे करा. तुम्हाला कॅज्युअल लूक हवा असो किंवा सर्वांमध्ये उठून दिसणारा एजी लूक असोइथे तुम्हाला आपली शैली व्यक्त करण्यासाठी नेमका पेहराव नक्की सापडेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading