Monday, July 27, 2026
Latest NewsSports

दुसऱ्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत मनिषा रॉयल्स, आरएस कॅनन्स, रॅक रायडर्स संघांची विजयी सलामी 

पुणे : पुना क्लब लिमिटेड आयोजित दुसऱ्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत गटसाखळी फेरीत  मनिषा रॉयल्स, आरएस कॅनन्स, रॅक रायडर्स या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पुना क्लब स्नूकर हॉल येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत अ गटात मिनू कारकरीया, कुणाल वासवानी, आर.के.शर्मा, अंगद सहानी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर मनिषा रॉयल्स संघाने परमार ऑल स्टार्स संघाचा 4-1 असा पराभव करून विजयी सलामी दिली. दुसऱ्या सामन्यात आरएस कॅनन्स संघाने टोर्नाडोज 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून रिकी राजपाल, माधव क्षीरसागर, निशांत मेहता, आनंद केरिंग यांनी अफलातून कामगिरी केली.

अन्य लढतीत रॅक रायडर्स संघाने बॉल ब्रेकर्स संघावर 4-1 असा विजय मिळवला. याआधी स्पर्धेचे उदघाटन पुना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष सुनील हांडा, मनिषा कन्स्ट्रकशनचे संचालक, बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि बीएसएफ आयचे माझी अध्यक्ष राजन खिंवसरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक  कपिल पंजाबी, कारा  इंटलेक्टचे रणजीत पांडे, विघ्नेश सांघवी, संजय संघवी, मुकेश संघवी, सूरज राठी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: गट साखळी फेरी:
अ गट: मनिषा रॉयल्स वि.वि.परमार ऑल स्टार्स 4-1(15 रेड हॅन्डीकॅप स्नूकर: रोहिंग्टन ईराणी पराभुत वि.सिद्धार्थ मोदी 80-108; 15  रेड हॅन्डीकॅप स्नूकर दुहेरी: मिनू कारकरीया/कुणाल वासवानी वि.वि.कपिल सरीन/उदित संघवी 95-42;  हॅन्डीकॅप बिलियर्ड्स(200पॉईंट्स): आर.के.शर्मा वि.वि.दशमेश कालरा 200-178; 6 रेड  हॅन्डीकॅप स्नूकर: अंगद सहानी वि.वि.नवीन कोचर 36-39; 47-33, 45-41; ब्लु शॉट:आर.के.शर्मा वि.वि.सिद्धार्थ मोदी 4-3;

अ गट: आरएस कॅनन्स वि.वि.टोर्नाडोज 3-2(15 रेड हॅन्डीकॅप स्नूकर: रिकी राजपाल वि.वि.अनिल काकडे 88-58; 15 रेड हॅन्डीकॅप स्नूकर दुहेरी: माधव क्षीरसागर/निशांत मेहता वि.वि.विशाल अरोरा/फारूख मोदी 115-68; हॅन्डीकॅप बिलियर्ड्स: आनंद केरिंग वि.वि.योहान थडानी 200-154; 6 रेड हॅन्डीकॅप स्नूकर: प्रणय माळगावकर पराभुत वि.आकाश दलवाणी 65-55,46-58, 32-46; ब्लु शॉट माधव क्षीरसागर पराभुत वि.फारूख मोदी 3-4:

ब गट: रॅक रायडर्स वि.वि.बॉल ब्रेकर्स 4-1(15 रेड हॅन्डीकॅप स्नूकर: मुनीझ पूनावाला वि.वि.विनोद मखिजा 105-79;15 रेड हॅन्डीकॅप स्नूकर दुहेरी: आशिष पटेल/अनिकेत संघवी वि.वि.रणजित पांडे/अंकित दामले 101-87; हॅन्डीकॅप बिलियर्ड्स: रमेश केरिंग वि.वि.टोनी शेट्टी 200-179; 6रेड हॅन्डीकॅप स्नूकर स्नूकर: अयान खान पराभुत वि.प्रशांत राजघरिया 33-42, 46-33, 35-74; ब्लु शॉट:मुनीझ पूनावाला वि.वि.अंकित दामले 4-3).

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading