नरेंद्र मोदी सांगा वाचवाल ना? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल!
मुंबई : “नरेंद्र मोदींनी #G20 शिखर परिषदेमध्ये भारताची नाचक्की होता होता कसंबसं “वाचवलं”, असं एक क्षण गृहीत धरूया”, असे म्हणत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील महत्त्वाच्या आणि मूलभूत गोष्टी वाचवण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, “नरेंद्र मोदी सांगा वाचवाल ना?” असा थेट सवाल विचारला आहे.
पुढे ट्विट मध्ये ॲड. आंबेडकर म्हणतात,
“आशा आहे आता तुम्ही –
१. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव आणि शेतकरी केंद्रित कृषी धोरण राबवून शेतकऱ्यांना कर्जबाजारी आणि कंगाल होण्यापासून वाचवाल.
२. कंत्राटी कामगारांचे शोषण, गैरवर्तन तसेच संरक्षण आणि मिळणाऱ्या फायद्यांचा अभावापासून वाचवाल.
३. भारताच्या वंचित आणि बहुजन समूहांना द्वेष, जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापाऱ्यांपासून वाचवाल, ज्याला तुमचेच भाजप-आरएसएसचे गुंड प्रोत्साहन देतायेत.
४. मानवी प्रतिष्ठेला मारक असणाऱ्या हाताने मानवी मैला उचलण्यासारख्या जाती आधारित प्रथांमुळे
भारताला लाज आणण्यापासून वाचवाल.
५. पितृसत्ता, लिंगभेद, महिलांप्रती द्वेषाची भावना आणि हिंसेच्या जाचापासून महिलांना वाचवाल.
६. SC/ST/OBC चे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण तसेच OBC चे राजकीय आरक्षण वाचवाल.
७. SC, ST, OBC, EBC, DNT आणि मुस्लिम यांच्या स्कॉलरशिप व फेलोशिपमध्ये आणखी कपात होण्यापासून तसेच त्या बंद होण्यापासून वाचवाल.
८. भारताच्या धार्मिक अल्पसंख्यांक आणि आदिवासींना जातीय नरसंहारापासून वाचवाल.
सांगा, वाचवाल ना ?”