आर आर काबल लिमिटेडचा आयपीओ १३ सप्टेंबर २०२३ रोजी खुला होणार
मुंबई : आर आर काबल लिमिटेड (“कंपनी”) आपला आयपीओ बुधवार १३ सप्टेंबर २०२३ रोजी खुला करणार आहे. या आयपीओमध्ये १,८०० मिलियन रुपयांपर्यंतच्या नव्याने जारी करण्यात आलेल्या इक्विटी समभागांचा आणि समभागांची विक्री करू इच्छिणाऱ्या समभागधारकांकडून १,७२,३६,८०८ पर्यंत इक्विटी समभागांच्या विक्रीचा समावेश आहे. या ऑफरमध्ये १०८ मिलियन रुपयांपर्यंत इक्विटी समभाग कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, महाराष्ट्र यांच्याकडे मुंबईमध्ये सादर करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे, प्रपोर्शनेट आधारे वाटपासाठी उपलब्ध करवून देण्यात येतील. कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या समभागांसाठी बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रत्येक इक्विटी समभागासाठी ९८ रुपयांची सूट दिली जाईल. कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भागाव्यतिरिक्त ऑफर ही “नेट ऑफर” आहे.
अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीची तारीख मंगळवार १२ सप्टेंबर २०२३ ठरवण्यात आली आहे. ही ऑफर सबस्क्रिप्शनसाठी बुधवार १३ सप्टेंबर २०२३ खुली होईल आणि शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ रोजी बंद होईल.
प्राईस बँड प्रत्येकी ५ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या, प्रत्येक इक्विटी समभागासाठी ९८३ ते १,०३५ रुपये निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी १४ आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास, १४ च्या पटीत समभागांसाठी बोली लावता येईल.
नव्याने जारी करण्यात आलेल्या समभागांच्या विक्रीतून जी रक्कम उभी राहील तिचा उपयोग कंपनीने बँका आणि आर्थिक संस्थांकडून घेतलेल्या जवळपास १,३६० मिलियन रुपयांच्या कर्जाची संपूर्ण किंवा अंशतः परतफेड किंवा मुदतपूर्व परतफेड करण्यासाठी केला जाईल आणि उरलेली रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी वापरली जाईल.
विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये महेंद्रकुमार रामेश्वरलाल काबरा यांच्याकडून ७,५४,४१७ पर्यंत; हेमंत महेंद्रकुमार काबरा यांच्याकडून ७,५४,४१७ पर्यंत; सुमीत महेंद्रकुमार काबरा यांच्याकडून ७,५४,४१७ पर्यंत; काबल बिल्डकॉन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ७,०७,२०० पर्यंत; राम रत्न वायर्स लिमिटेडकडून १३,६४,४८० पर्यंत आणि टीपीजी एशिया VII एसएफ पीटीई लिमिटेडकडून १,२९,०१,८७७ पर्यंत इक्विटी समभागांचा समावेश आहे. (समभाग विक्री करू इच्छिणारे गुंतवणूकदार)
हे इक्विटी समभाग आरएचपीमार्फत सादर केले जात आहेत आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत. ऑफरच्या उद्देशासाठी बीएसई हे नियुक्त स्टॉक एक्स्चेंज आहे.
ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, १९५७ च्या नियम १९ (२) (बी) अनुसार, संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम ३१ नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम ६(१) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी ५०% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील. यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६०% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील.
नेट क्यूआयबी पोर्शनपैकी ५% हे विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. या नेट ऑफरमधील जास्तीत जास्त १५% भाग क्वालिफाईड नॉन-इन्स्टिट्यूशनल बिडर्सना (“नॉन-इन्स्टिट्यूशनल पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील त्यापैकी एक तृतीयांश भाग ०.२ मिलियन रुपयांपेक्षा जास्त आणि १ मिलियन रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी आणि यापैकी दोन तृतीयांश भाग १ मिलियन रुपयांपेक्षा जास्त अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी आणि जास्तीत जास्त ३५% भाग सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे रिटेल व्यक्तिगत गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवण्यात आला आहे, पण यासाठी ऑफर किमतीपेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भागासाठी अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना इक्विटी समभाग प्रपोर्शनेट आधारे वाटून देण्यात येतील. त्यांच्यासाठी त्यांच्याकडून ऑफर किमतीइतकी किंवा त्यापेक्षा जास्त बोली येणे आवश्यक आहे.
सर्व संभाव्य बिडर्स बोली लावणारे सर्व (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक तपशिलांसाठी आरएचपीचे पान क्रमांक ४३६ वर “ऑफर प्रोसिजर” पहा.
या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे आहेत.
या वृत्तातील ज्या संज्ञांचा अर्थ, व्याख्या देण्यात आलेली नाही त्यांचा जो अर्थ आरएचपीमध्ये आहे तोच ग्राह्य मानला जाईल.
