ॲड. अजित चौगुले यांना पुणे उद्योजक पुरस्कार
पुणे : ॲड. अजित अर्जुन चौगुले यांना पुणे उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड येथे स्विफ्ट अँड लिफ्ट मीडियाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड. अजित चौगुले व त्यांच्या मातोश्री अंजली अर्जुन चौगुले यांना येवले चहाचे संस्थापक नवनाथ येवले, स्विफ्ट अँड लिफ्ट मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश साने यांच्या हस्ते लिगल सर्व्हिसेस या प्रकारातून बेस्ट अपकमिंग फर्स्ट जनरेशन एडवोकेट ऑफ द ईअर या पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.