fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsSports

हसीना शेख यांना तिहेरी मुकुट


पुणे: आबेदा इनामदार ज्यु. कॉलेजच्या क्रीडा शिक्षका हसीना शेख यांना श्रीलंकेत झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स अथलेटिक स्पर्धेत शानदार कामगिरी बजावताना तिहेरी मुकुट पटकावला.
३५ वर्षांपेक्षा अधिक गटात हसीना शेख यांनी तिहेरी उडी प्रकारात ८.१० मीटरची उडी मारताना सुवर्ण पदकाची कमाई केली. उंच उडी प्रकारात १ मीटर ५ सेंटीमीटर उडी मारताना रौप्य पदक मिळविले. लांब उडी प्रकारात ३.९५ मीटर उडीमध्ये कांस्य पदकाची कमाई केली.
हसीना शेख यांनी केलेल्या दमदार कामगिरीसाठी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सचिव प्रा. इरफान शेख, रोशन आरा शेख, प्राचार्य व आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ. गुलजार शेख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: