Monday, July 27, 2026
Latest NewsPUNE

बासरीवादनाने शिष्यांची गुरु पं मिलिंद दाते यांना ‘गुरुवंदना’

पुणे : गुरुप्रती आदर व्यक्त करण्याच्या हेतूने पं मिलिंद दाते यांचे शिष्य आपल्या बासरीवादनाने दाते यांना गुरुवंदना देणार आहेत. येत्या शनिवार दि. ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून कर्वेनगर येथील क्षिप्रा सोसायटी मधील क्षिप्रा सोसायटी सभागृहात सदर कार्यक्रम होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

या कार्यक्रमात पं मिलिंद दाते यांचे शिष्य निनाद बर्वे, हरीश पांडे, रचित शर्मा, कृष्णमूर्ती, गौरी देशपांडे, अमेय खरे, अर्जुन दीक्षित, अनुराग जोशी, राहुल कुलकर्णी, संदीप कपटकर, निखिल चौधरी, स्वामी मुळे, महेश जेस्ते ही सेनिया-मैहर घराण्याची पुण्यातील पुढची पिढी गुरुवंदना म्हणून सादरीकरण करणार आहे. यावेळी पं चारुदत्त फडके, पं अरविंद परांजपे, ओंकार भोर्डे हे तबलासाथ करतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading