fbpx
Tuesday, October 3, 2023
BusinessLatest News

एमएमटीसी-पीएएमपी तर्फे पुण्यातील पहिले गोल्ड बार चॅलेंज

पुणे: भारतातील एकमेव लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (एलबीएमए) गुड डिलिव्हरी गोल्ड आणि सिल्व्हर रिफायनरी एमएमटीसी-पीएएमपी ने त्यांच्या पुण्यातील खास वैशिष्ट्यपूर्ण दालन पीव्हीसी (प्युरिटी व्हेरिफिकेशन सेंटर) येथे रोमहर्षक गोल्ड बार चॅलेंज कार्यक्रमाचे आयोजन केले. हा कार्यक्रम शनिवार आणि रविवार२ आणि ३ सप्टेंबर रोजी लक्ष्मी रोडपुणेमहाराष्ट्र येथे झाला.

 

एमएमटीसी-पीएएमपी ने त्यांच्या खास आउटलेटवर गोल्ड बार चॅलेंज या खुल्या कार्यक्रमाचे आयोजन केले होतेयामध्ये सहभागींना ठरवून दिलेल्या वेळेच्या मर्यादेत ५.७ किलोग्रॅम सोन्याचे बार काचेच्या आवरणातून परत काढायचे आव्हान देण्यात आले. सुवर्णप्रेमींना त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्याची आणि प्रतिष्ठेचे पारितोषिक जिंकण्याची उत्साहवर्धक संधी पुरविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. हे आव्हान पूर्ण केलेल्या बारा विजेत्यांना एमएमटीसी-पीएएमपी च्या बनीयन ट्री ९९९.९ शुद्ध १० ग्रॅम चांदीचा बार देऊन गौरविण्यात आले. भारताचा राष्ट्रीय वृक्ष असलेला वटवृक्ष दीर्घायुष्य आणि परिपूर्णतेचे प्रतीक आहे. संपूर्ण कार्यक्रमात नियमांचे आणि अटींचे पालन करून सुरक्षा आणि निष्पक्षता सुनिश्चित केली गेली.

 

या कार्यक्रमाविषयी बोलताना, एमएमटीसी-पीएएमपी चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विकास सिंग म्हणाले, “एमएमटीसी-पीएएमपी स्टोअर्स हे सर्वात शुद्ध सोने आणि चांदीमध्ये अद्वितीय आणि वैशिष्ट्यपूर्णपणे तयार केलेली उत्पादने सादर करणारी डेस्टिनेशन स्टोअर्स आहेत. गोल्ड बार चॅलेंज कार्यक्रमासह आमच्या ग्राहकांना आनंद आणि उत्साह यांची भर घालणारा एक नवीन वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक अनुभव देऊन त्यांच्यासाठी आम्ही आता हे आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. सोन्या-चांदीसाठी आमच्यावर नेहमीच विश्वास ठेवणाऱ्या आमच्या ग्राहकांसाठी आनंदाचे क्षण जोडण्याच्या आमच्या बांधिलकीची ही पावती आहेअत्याधुनिक उत्पादने आणि अनोखे अनुभव सादर करण्यावर आमचा असलेला भर वैशिष्ट्यपूर्ण अनोख्या आणि मजेदार पद्धतीने ग्राहकांना सहभागी करून घेण्याच्या आणि त्यांचे समाधान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. निकोप स्पर्धेची भावना वाढवूनआमच्या ग्राहकांशी मजबूत संबंध निर्माण करणे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी संस्मरणीय अनुभव निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.

 

मुंबईनोएडाचेन्नईहैदराबादबंगळुरू आणि आता पुणे येथे गोल्ड बार चॅलेंजच्या यशामुळे एमएमटीसीपीएएमपी साठी या अनोख्या कार्यक्रमाचा इतर शहरांमध्ये विस्तार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,” असे श्री विकास सिंग पुढे म्हणालेगोल्ड बार चॅलेंज हा एक अनोखा कार्यक्रम  आहेभारतीय बाजारपेठेत क्वचितच होणारा असा हा कार्यक्रम असून आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आम्ही हा कार्यक्रम भविष्यात जम्मू आणि चंदीगड शहरांमध्ये देखील करणार आहोत.”“पुढील गोल्ड बार चॅलेंज रांका ज्वेलर्सपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्र येथे ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणार आहे.

 

ग्राहकांना उच्च-गुणवत्तेचीसांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण उत्पादने प्रदान करण्याच्या बांधिलकीसाठी ओळखले जाणाऱ्या एमएमटीसी-पीएएमपी ने कोणत्याही सोन्या-चांदीच्या गरजांसाठी त्यांच्या वन-स्टॉप शॉपमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता. उत्पादनाची सत्यता सुनिश्चित करण्यासाठीप्रत्येक एमएमटीसी-पीएएमपी उत्पादनामध्ये एक विशिष्ट  क्रमांक असतो आणि तो योग्य पारख असलेल्या निरीक्षकाकडून स्वाक्षरी केलेल्या प्रमाणित स्वरूपात पॅकेज केलेला असतो. एमएमटीसी-पीएएमपी कडून खरेदी केलेले प्रत्येक सोने आणि चांदीचे उत्पादन वजन आणि शुद्धता यांचा योग्य समतोल राखते.  तुम्ही खरेदी करता त्या प्रत्येक नाणे किंवा बारचे वजन सूचीबद्ध वजनापेक्षा जास्त असेल अशी हमी यातून मिळते जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीचे सर्वोच्च मूल्य मिळायची खात्री होते.

 

सर्व उत्पादने एमएमटीसी-पीएएमपी च्या अस्सलतेच्या शिक्क्यासह येतात आणि ९९९.९+ शुद्धतेचे वचन देतात आणि नवीनतम स्विस तंत्रज्ञान वापरून सर्वोच्च मानकांनुसार तयार केले जातात. आता शुद्ध सोने आणि चांदीच्या उत्पादनांमधून निवडण्यासाठी विविधता आहे आणि कोणीही ती एमएमटीसी-पीएएमपी च्या विशेष दालनांमधूनआघाडीचे ज्वेलर्स पार्टनर्सअॅमझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन मार्केटप्लेसमधून किंवा थेट एमएमटीसी-पीएएमपी च्या स्वतःच्या वेबसाइट shop.mmtcpamp.com वरून खरेदी करू शकतात.

Leave a Reply

%d bloggers like this: