Tuesday, July 28, 2026
Latest NewsPUNE

विशेष मुलांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमुर्ती

पुणे : कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटी संचलित कामायनी गोखलेनगर, पुणे. या संस्थेतील विशेष मुलांसाठी आज दि .६ / २ / २०२६ संस्थेत पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेशमुर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेचा मुख्य उद्देश हा विशेष विद्यार्थ्यांचे हस्तनेत्र समायोजन वाढण्यास मदत, एकाग्रता वाढण्यास भदत, कमी जास्त, लहान – मोठे ही संकल्पना समजणे, निरीक्षण शक्तीला वाव मिळणे, कलागुणांना वाव मिळण्यास मदत व्हावी तसेच या पर्यावरण पुरक गणेशोत्सव शहरात साजरा करण्याचा संदेश दिला.
चित्रकार उमेश वाघ यांनी प्रात्यक्षिक करून मार्गर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे ट्रस्टी श्रीलेखाताई कुलकर्णी, सोचे कार्याध्यक्ष मा. डॉ आशुतोष भुपटकर, खजिनदार प्रदीप मोघे व कार्यशाळेचे व्यवस्थापक मा. श्री विजय टोपे उपस्थित होते तसेच या कार्यशाळेची संकल्पना प्राचार्या मा. श्रीमती सुजाता आंबे यांनी केले व याकार्यशाळेचे नियोजन शाळेतील सर्व कलाशिक्षकांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading