के.ए.पाटील लिखित माझी अतूट नाळ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
पुणे : जीवनातील संघर्षमय वाटचाल करीत असताना अनेकांचे आशीर्वाद ,मदतीचे ,ममतेचे हात यशस्वी आयुष्य उभारणीला लागल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील प्रसंगाची जात ठेवून त्यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूनेच माझी अतूट नाळ या पुस्तकाची निर्मिती झाली.असे या पुस्तकाचे लेखक के.ए. पाटील यांनी आपल्या मनोगतात आपला ऋणनिर्देश व्यक्त केला. या पुस्तकाचे प्रकाशन माजी नगरसेवक या दिलीप वेडे (पाटील ) यांच्या हस्ते झाले.यावेळी व्यासपीठावर बॅंक ऑफ बडोदाचे माजी सरव्यवस्थापक श्री पी.डी.पोतनीस, माजी संचालक व्ही. बी चव्हाण, सौ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणावर त्यांचा वाचकवर्ग व हितचिंतकाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम कोथरूड येथील राजलक्ष्मी हॉल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद पाटील यांनी केले.