Sunday, July 26, 2026
Latest NewsSports

दुसऱ्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत दहा संघ सहभागी

 पुणे : पुना क्लब लिमिटेड आयोजित दुसऱ्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत १० संघ सहभागी झाले असून यामध्ये ६५हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा पुना क्लब स्नूकर हॉल येथे १० ते १७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत रंगणार आहे.

पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना पुना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष सुनील हांडा, उपाध्यक्ष गौरव गढोके, स्पर्धा संचालक रणजीत पांडे आणि कपिल पंजाबी यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे सलग दुसरे वर्ष असून पूना क्लबच्या सदस्यांसाठी खास ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा समावेश असून यामध्ये कपिल पंजाबी, विघ्नेश सांघवी, सुनील हांडा, राजू खांडके, गिरीश दामले हे खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. पुना क्लब लिमिटेडचे सचिव कर्नल सरकार आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेला मनिषा कन्स्ट्रकशनचे संचालक, बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि बीएसएफ आयचे माझी अध्यक्ष राजन खिंवसरा यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. बिलियर्ड्स अँड स्नूकर क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल राजन खिंवसराला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

स्पर्धेत राज्याचा क्र.5खेळाडू सूरज राठी(10000पॉइंट्स, रॉकेटस), विघ्नेश संघवी(द व्हर्लविंड्स) , कपिल पंजाबी(रॉकेटस) हे महागडे खेळाडू ठरले आहेत.

तसेच, ४सप्टेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या लिलावात ७० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. पुण्यातील क्यु स्पोर्ट्समधील स्नूकरपटू स्वर्गीय शांतीलाल सांघवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान करण्यात येणाऱ्या करंडकासाठी हे खेळाडू झुंजनार आहेत.

स्पर्धेतील सहभागी दहा संघामध्ये मनिषा रॉयल्स (राजन खिंवसरा व अभिषेक खिंवसरा), मनप्रीत अँड गौरव जागवार्स(मनप्रीत उप्पल व गौरव गढोके), बॉल ब्रेकर्स(विनोद मखिजा व आदित्य शेट्टी), परमार ऑल स्टार्स (हिरेन परमार व सनत परमार), आरएस कॅनन्स(रिकी राजपाल व सिद्धार्थ सणस), रॉकेटस् (राहुल बग्गा, वैभव शहा), सांघवी शुटर्स(संजय व मुकेश सांघवी), द व्हर्लविंड्स (साहिल हांडा व अनिल अडवाणी), रॅक रायडर्स(सरीम खान व राजीव राऊत) आणि टोर्नाडोज(जहांगीर दोराबजी व डॅनियल दोराबजी)यांचा समावेश असून हे संघ विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये अध्यक्ष सुनील हांडा, कपिल पंजाबी, विघ्नेश सांघवी, सूरज राठी, जमशेद गार्डा, अनिश केरींग, रणजीत पांडे यांचा समावेश आहे. कारा इंटलेक्ट यांच्या संकल्पेनेतून व व्यवस्थापनेतून ही स्पर्धा होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading