Monday, September 14, 2026
Latest NewsPUNE

“फर्ग्युसनमध्ये विद्यार्थी झाले शिक्षक…..”


पुणे : शिक्षक दिनानिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयातील कनिष्ठ विभागात सकाळी दहा ते पाच ह्या महाविद्यालयीन वेळापत्रकाचे संपूर्ण कामकाज इयत्ता 11 वी व 12 च्या विद्यार्थ्यांनी सांभाळले. 40 मिनिटांची एक तासिका ह्याप्रमाणे कला व विज्ञान शाखेचे सर्व विषयांचे 80 विद्यार्थ्यांनी अध्यापन केले. शैक्षणिक कामकाज पाहण्यासाठी विद्यार्थ्यांमधून उपप्राचार्यांची धुरा बारावीतील विद्यार्थिनी साची वाघमारे हिने तर पर्यवेक्षकाची भूमिका शरवी हिने सांभाळली.

अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्राचार्य नितीन कुलकर्णी, उपप्राचार्य नारायण कुलकर्णी, संस्थेच्या प्रबंधक डॉ सविता केळकर, पर्यवेक्षक गोरख हटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सांस्कृतिक विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading