ह्या मालिकेमध्ये कोणीही खलनायक नाही आहे : रुची कदम
१. सारं काही तिच्यासाठी ह्या मालिकेबद्दल काय सांगशील ?
– ही मालिका सख्या बहिणींच्या नात्यांमधली एक सुंदर कथा आहे ज्या २० वर्षांपासून काही कारणांमुळे एकमेकांपासून दुरावल्या. ही कथा आपल्या दैनंदिन कौटुंबिक जीवनाशी संबंधित आहे. या मालिकेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात कोणीही खलनायक नाही. सहसा आपल्या कुटुंबात खलनायक स्वभावाचा कोणही नसतो. त्यामुळे या कथेची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण व्हायला सुरवात झाली आहे आणि खूप मजा येणार आहे.
२. ओवी या तुझ्या भूमिकेबद्दल/पात्राबद्दल काय सांगशील?
– मी ओवीचे पात्र साकारत आहे. ओवी पाश्चात्य संस्कृतीत वाढली आहे. ती अतिशय व्यावहारिक सरळ आणि स्वच्छंदी स्वभावाची मुलगी आहे. पण याचा अर्थ असा नाही की ती प्रेमळ नाही, ती ही खूप प्रेमळ स्वभावाची आहे.जर कोणी तिच्या आई बाबांबद्दल वाईट बोलले तर ते तिला अजिबात आवडत नाही. तिचे तिच्या आई बाबांवर खूप प्रेम आहे.ती अतिशय उत्साही स्वभावाची आहे. ती खूप चैतन्यशील सुद्धा आहे.
३. तुझ्या सहकलाकारांबद्दल काय सांगशील ?
– माझे सहकलाकार खूप अनुभवी आणि अप्रतिम कलाकार आहेत. व मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद वाटतो. या सर्वांकडून मला खूप काही शिकायला मिळते. प्रत्येकजण सेटवर एकमेकांसोबत खूप आधाराने वागतात. आम्ही खूप मज्जा करतो. अशा अप्रतिम मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी खरोखरच झी मराठीची आभारी आहे.
तेव्हा पाहायला विसरू नका “सारं काही तिच्यासाठी”सोमवार ते शनिवार संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.