Tuesday, November 3, 2026
BusinessLatest News

दहाव्या आयएमई २०२३ मध्ये होणार आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन

पुणे : चार दिवसीय आंतरराष्ट्रीय खाण, उपकरणे आणि खनिजे (आयएमई २०२३) ची १० वी आवृत्ती ६ नोव्हेंबर २०२३ रोजी कोलकाता येथे सुरू होणार आहे ज्यामध्ये 30 हून अधिक देशांमधून प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यासोबतच होणाऱ्या १० व्या एशियन मायनिंग काँग्रेसमध्ये आशिया आणि जागतिक खनिकर्म समुहांच्या फायद्याच्या ठरू शकतील अशा शाश्वत व्यवसायाच्या नव्या संधी विकसित करण्याबरोबरच खनिज उत्पादनच्या क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रगती साधण्याच्या दृष्टीने तांत्रिक-वैज्ञानिक सहकार्याचा पुरस्कार करण्यासाठीचा एक मंच पुरविला जाईल.

आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात खाण, खनिजे आणि संबंधित उद्योगांसह पर्यायी ऊर्जा स्रोत, इलेक्ट्रिक वाहने देखील प्रदर्शित केली जातील.

‘रोडमॅप फॉर बेस्ट मायनिंग प्रॅक्टिसेस व्हिज-अ-व्हिज ग्लोबल ट्रान्स्फॉर्मेशन’ अर्थात जागतिक परिवर्तनाच्या अनुषंगाने सर्वोत्तम खनिकर्म पद्धतींसाठीचा आराखडा हे यावर्षीच्या मायनिंग काँग्रेसचे विषयसूत्र असून, त्यात खनिकर्माच्या सर्वोत्तम पद्धतींवर विचारमंथन होण्याची शक्यता आहे, जिथे या क्षेत्रातील ताज्या घडामोडी, अद्ययावत तंत्रज्ञान, उपकरणांची उपलब्धता तसेच या काळाशी सुसंगत अद्ययावत नवतंत्रज्ञान यांचा आढावा घेतला जाईल. त्याचबरोबर या क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाचाही या चर्चेत समावेश असेल.

माननीय कोळसा खाण आणि संसदीय कामकाज मंत्री, भारत सरकार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल आणि परदेशी व्यापार आयोग तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारांचे अनेक वरीष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल, अशी अपेक्षा आहे.

खाण, खनिजे आणि संबंधित उद्योगक्षेत्रासह स्टील, मेटॅलर्जी, बांधकाम-साहित्य, सामग्री, पर्यायी उर्जास्त्रोत, विद्युत वाहने यांसारख्या विशाल उद्योगक्षेत्रांतील संस्था या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील.

टॅफकॉन ने एमजीएमआयच्या साथीने आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये २५,००० उच्च मूल्य व्यापारांचे प्रतिनिधी, जवळ-जवळ १५,००० ट्रेड व्हिजिटर्स आणि १००० प्रतिनिधी त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, चीन, झेक रिपब्लिक, जर्मनी, पोलंड, रशिया, तुर्कस्थान, इराण, यूके आणि यूएसएच्या देशांची अनेक व्यापार प्रतिनिधी मंडळेही भेट देतील, अशी अपेक्षा आहे.

टॅफकॉन प्रोजेक्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग वर्कर आयपी वाधवा म्हणाले, हा उपक्रम म्हणजे स्टील, मेटॅलर्जी, बांधकाम-साहित्य, सामग्री तसेच भावी काळातील पर्यायी उर्जा आणि विद्युत वाहन क्षेत्रासारख्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचांचे प्रतिनिधीत्व करणारा हा अशाप्रकारचा पहिलाच मंच ठरणार आहे.

भारतामध्ये नवा प्रवाह घेऊन येणाऱ्या परिषदा व प्रदर्शनांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या चार दिवसीय भव्य कार्यक्रमामध्ये बीटूबी बैठकाही पार पडतील व इंटरनॅशनल स्टील अँड मेटॅलर्जी प्रदर्शने अर्थात आयएसएमइचा प्रमुख उपक्रम असणारे आयएमइ तसेच सीइएम इंटरनॅशनल कन्स्ट्रक्शन, इक्विपमेंट अँड मटीरिअल्स एक्झिबिशन या प्रदर्शनांच्या जोडीने त्याच ठिकाणी या बैठकांचे आयोजन केले जाईल.

भारत हा सध्या क्रूड स्टीलच्या निर्मितीमध्ये जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे आणि बांधकामक्षेत्र हे या देशाच्या विकासाला चालना देणाऱ्या घटकांपैकी एक घटक आहे हे लक्षात घेता या उपक्रमाचे औचित्य खूपच मोठे आहे. ऊर्जा क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवरच नवीन प्रगती आणि उपक्रमांची गरज आहे, या पार्श्वभूमीवर ही बीटूबी प्रदर्शने वाढत्या आंतरराष्ट्रीय सहभागासाठी आणि व्यवसायाच्या भरभराटीसाठी एक अनोखी जागा ठरेल अशी ग्वाही या उपक्रमाने दिली आहे.

Leave a Reply