लक्ष्मीबाई रानडे वक्तृत्व स्पर्धेत रावी नामजोशीचे यश
पुणे : अहिल्यादेवी शाळेने आयोजित केलेल्या लक्ष्मीबाई रानडे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या रावी नामजोशी या विद्यार्थिनीने पहिला क्रमांक मिळविला. लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेला सत्तर वर्षांची परंपरा आहे.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
प्रथम क्रमांक – रावी नामजोशी, गोळवलकर प्रशाला
द्वितीय क्रमांक – मधुरा खिरे, अहिल्यादेवी प्रशाला
तृतीय क्रमांक – वाणी कोयाळीकर, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला
चौथा क्रमांक – अग्रणी साठे, गोळवलकर प्रशाला
पाचवा क्रमांक – गौरांगी कनोजे, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड
मुख्याध्यापिका अनघा डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूषा शेलूकर, दिपाली थोरात, सुलोचना माने, सुवर्णा परदेशी यांनी संयोजन केले.
