मराठा आरक्षण : फडणवीसांनी मागितली माफी तर आजितदादांनी दिले चॅलेंज; प्रश्न मात्र जैसे थे
मुंबई : जालन्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईचे सरकार समर्थन करत नाही. पण सरकारने कारवाईचे आदेश दिले, असे सांगत विरोधक राजकारण करीत आहेत. सरकारने लाठीचार्जचे आदेश दिले होते हे सिद्ध करा, राजकारण सोडू, असे खुले चॅलेंज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना दिले.
जालन्यात मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळी मराठा आरक्षण आंदोलकांवर 1 सप्टेंबरला पोलिसांकडून लाठीमार झाला. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी रासतारोको, बंद व जाळपोळ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणा संदर्भात उच्चस्तरीय बैठक आज घेण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी उपस्थित होते. याविषयी माहिती सरकारच्या वतीने आज माहिती देण्यात आली.
मी शासनाच्या वतीने माफी मागतो – देवेंद्र फडणवीस
फडणवीस म्हणाले, यापूर्वी ही मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाली. मात्र कधीही आंदोलकांवर कधीही लाठीमार करण्यात आले नव्हते. परवा झालेली घटना दुर्दैवी आहे. ही चुकीची असून त्यासंदर्भात चौकशी केली जाणार आहे. जखमींची मी शासनाच्या वतीने माफी मागतो. यावरून राजकारण सुरू आहे. मंत्रालयातून कारवाईचे आदेश आले,असे म्हणत आहेत. त्यांनी सांगाव की, मावळमध्ये गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले होते? सरकार मराठा आरक्षणाबाबाद गंभीर आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोनच राज्यात आरक्षणाचे कायदे लागू करण्यात आले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले आहे. ते आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कमी पडले. उद्धव ठाकरे आता म्हणतात वटहुकूम काढा मग वर्षभर ते मुख्यमंत्री असताना त्यांनी वाटहुकूम का काढला नाही? असा सवाल विचारलं.
जरांगे यांच्या मागणीवर महिनाभरात अहवाल देण्याचे आदेश – शिंदे
शिंदे म्हणाले, सरकार स्थापन झाल्यापासून राजकारण सुरू आहे. काही राजकारणी मराठा आंदोलकांमध्ये जातीपाटीचे राजकारण करत आहे. त्यापासून मराठा आंदोलकांनी जपून राहावे. जालन्यातील उपोषण करते जरांगे यांच्या जीवाची आम्हाला चिंता आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही राज्यासारकारची भूमिका आहे. अन् ते मिळवून देण्यासाठी पुढील काळातही सरकार पाठपुरावा करणार आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा समाज मागासलेला नाही, असे सांगत आरक्षण नाकारले आहे. पण राज्य सरकार मराठा समाज आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेला असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून ती याविषयी माहिती गोळा करण्याचे काम करत आहे. जरांगे यांची मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याची मागणी आहे. त्याविषयी महसूल विभागाचे अतिरिक्त पोलिस सचिव काम करणार असून आहे. महिनाभरात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहे.
मराठा आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे – अजित पवार
अजित पवार म्हणाले, यापूर्वी मराठा आरक्षणाची खूप आंदोलन झाली. ज्याचे कौतुक देशपातळीवर करण्यात आले. मात्र यावेळी मराठा आंदोलकांनी केलेली जाळपोळ ही आंदोलनाला गालबोट लावणारी आहे. सरकारी गाड्यांचे नुकसान, बंद आणि रास्ता रोको केल्याने आपल्याच नुकसान होत आहे. त्यामुळे पुढील काळात मराठा आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे असे आवाहन अजित पवार यांनी केले.
दोषी पोलिसांवर कारवाई
जालण्यातील मराठा रक्षण उपोषण स्थळी पोलिसांनी लाठीमार केला. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी पोलिस महासंचालकांच्या उच्च स्तरीय चौकशी स्थापन करण्यात आली आहे. एसपी ला जिल्हया बाहेर पाठवले. तर इतर दोन पोलिस अधिकाऱ्यांना निळंबीत करण्यात आले आहे.
