स्मिताच्या लग्नात सरकारांची एन्ट्री स्मिताचं लग्न सुखरूप पार पडेल?
‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेच्या येत्या महाएपिसोड च्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल, स्मिताच्या लग्नाची जोरदार धामधूम चालू आहे. खूप दिवसांनी घरात मोठ्ठ कार्य असल्याने सगळेच खुश आहेत. अप्पी आणि अर्जुन लग्नासाठी शॉपिंग करतात पण अप्पीलाच सगळा खर्च आणि सगळा भार तिच्यावरच पडतोय याची कुठेतरी अर्जुनला रुखरुख लागलेय. पण आप्पीला माझ्या पगाराचा याहून चांगला उपयोग आजवर झाला नाहीये असं वाटतंय. स्मिताला मेहेंदी काढली जातेय आणि घरी संगीताचा कार्यक्रम होतोय, सगळे खुश आहेत पण सुजय मात्र भेदरलेला आणि शांत शांत आहे, या मागे नक्की काय कारण असेल? स्मिताच्या लग्नात सरकारांची एन्ट्री स्मिताचं लग्न सुखरूप पार पडेल? सुजय काय नवीन गोंधळ घालेल ? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी हा महाएपिसोड बिलकुल चुकवू नका.
‘अप्पी आमची कलेक्टर’ चा महाएपिसोड येत्या रविवारी ३ सप्टेंबरला, दुपारी १ वाजता आणि संध्या.७ वा. फक्त आपल्या झी मराठी वर.