fbpx
Tuesday, September 26, 2023
BusinessLatest News

रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुणे पीपल्स बँकेची ग्राहकांसाठी अनोखी भेट


पुणे : पुणे पीपल्स को-आॅप बँक लि., पुणे तर्फे रक्षाबंधनानिमित्त ग्राहकांना अनोखी भेट देण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत ग्राहकांना आवश्यक सेवा तत्परतेने देण्यासाठी बँकेने कर्जाचे घरबसल्या जलद वितरण, अद्ययावत मोबाईल अ‍ॅप आणि त्वरीत नवीन खाते उघडण्याची सुविधा दिली आहे. बँकेने आपल्या सर्व शाखांमध्ये संचालक मंडळ व बोर्ड आॅफ मॅनेजमेंट सदस्यांच्या उपस्थितीत सन्माननीय ग्राहक खातेदारांना राखी बांधण्याचा तसेच अद्ययावत सुविधांचा ग्राहकार्पण समारंभ आयोजित केला होता.

बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या या उपक्रमास बँकेच्या असंख्य सभासद खातेदारांनी उत्स्कृत प्रतिसाद दिला व मोबाईल अ‍ॅपसाठी रजिस्ट्रेशन केले. बँकेचे संचालक बबनराव भेगडे – तळेगाव शाखा, श्रीधर गायकवाड – सिंहगड व न-हे शाखा, सुभाष नडे -थेरगाव शाखा, बिपीनकुमार शहा-लक्ष्मी रोड शाखा, डॉ. रमेश सोनावणे – बाणेर शाखा, सुभाष गांधी – नगर रोड व कसबा पेठ शाखा, निशा करपे – सोमवार पेठ शाखा, संजीव असवले – चिंचवड व स्पाईन रोड शाखा, विश्वनाथ जाधव – कोथरुड व कर्वेनगर शाखा, श्वेता ढमाळ – मार्केट यार्ड शाखा, सौरभ अमराळे – हडपसर शाखा, सीए अजिंक्य रणदिवे व कौस्तुभ भेगडे – सहकारनगर शाखा व उदय जगताप- बिबवेवाडी शाखा येथे उपस्थित राहून सभासद व खातेदारांसोबत रक्षाबंधन साजरे केले. महिला सेवकांनी खातेदारांचे पारंपारिक पध्दतीने स्वागत देखील केले.

अ‍ॅड.सुभाष मोहिते म्हणाले, बँकेची स्थापना सन १९५२ साली झाली. केवळ ४६ सभासदांपासून सुरु झालेल्या बँकेच्या रोपटयाचा आज वटवृक्ष झाला आहे. मार्च २०२३ मध्ये बॅंकेच्या ठेवी १४०१ कोटी कर्जे ९१८ कोटी , व्यवसाय २३१९ कोटी, व नफा १३.८० कोटी, व एनपीए ० टक्के आहे. ग्राहकांसाठी देण्यात येणा-या सुविधांमध्ये काळानुरुप बदल होत असून बँकेच्या २२ शाखा पुणे, आळंदी, ठाणे, बेळगाव आणि परिसरात आज कार्यरत आहेत. कर्ज वाटप प्रक्रियेमध्ये ग्राहकांना स्वत: घरबसल्या इंटरनेटद्वारे आॅनलाईन अर्ज करता येणार आहे. याद्वारे कर्जासाठीची पात्रता देखील ग्राहकांना समजेल. तसेच ग्राहकांनी केलेल्या लॉगीन आयडी द्वारे एका पेक्षा जास्त कर्ज प्रकारांसाठी देखील अर्ज करता येईल.

याशिवाय ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅपद्वारे एनईएफटी/आरटीजीएस, चेक बुक मागणी, एम पासबुक, मिनी स्टेटमेंट, डेबीट कार्ड लॉक करण्याची सुविधा, बँकेच्या शाखा व एटीएमची ठिकाणे यांसह अनेक सुविधा देखील या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. यामुळे सहकारी बँकेमध्ये इतर बँकांप्रमाणे सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: