Thursday, May 14, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटसारखी खोटी वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या खोट्या वेबसाईटच्या माध्यमातून लोकांची खासगी माहिती काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. ( Cyber ​​attack on Supreme Court website)

सर्वोच्च न्यायालयाची खोटी वेबसाईट तयार करण्यात आली आहे. सायबर हल्ला करण्याच्या तयारीने खोटी वेबसाईट तयार केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान अशा प्रकारची कुठलीही लिंक ओपन करण्यापूर्वी अधिकृत आहे का हे पडताळून पाहण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. सोबतच आम्ही कोणाचीही वैयक्तिक माहिती, आर्थिक माहिती मागितली नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री विभागाने यासंबंधीचे एक निवेदन जाहीर केले आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटसारखीच आणखी एक वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटला ओपन केल्यानंतर त्यामध्ये खासगी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर या वेबसाईटमुळे कोणाची खासगी माहिती गेली असेल तर याबाबत त्वरित तक्रार दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading